Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २ मे, २०२१
Home
/
Unlabelled
/
निमडाळे येथील रेशनचे धान्य काळ्या बाजारात घेवून जाणारी गाडी पकडल्यानंतर देखील गुन्हा दाखल नाही
निमडाळे येथील रेशनचे धान्य काळ्या बाजारात घेवून जाणारी गाडी पकडल्यानंतर देखील गुन्हा दाखल नाही
(उपसंपादक- पंकज पाटील )केंद्र सरकारने गरीबांसाठी रेशनचे धान्य मोफत द्यायचे असे जाहिर केले असले तरी ते रेशन धान्य गरिबांपर्यत पोहचत का ?
असे अनेक प्रश्न जनतेच्या मनात असले तरी शासन मात्र त्या दिशेने काम करताना दिसत नाही .
आज निमडाळे तालुका ,जिल्हा धुळे येथील जिजामाता महिला मंडळ स्वस्त धान्य दुकान नं ५८ यांच्या दुकानातून निमडाळे येथून रेशन धान्य माल काळ्या बाजारात विकण्याच्या हेतूने घेवून जात असताना निमडाळे येथील ग्रामस्थांनी ती रेशन धान्य मालाची गाडी पकडली .त्यात रेशनचा गहू ,तांदूळ ,मका व ज्वारी आढळून आली.
रेशनचा मुद्दे माल सापळल्या नंतर देखील धुळे येथील पुरवठा अधिकारी ,तहसिलदार व जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी रेशन दुकानदारावर जीवनावश्यक वस्तू अधिनियम कलम ३ व ७ अनव्ये गुन्हा दाखल न करता प्रकरण कागदोपत्री फिरवून काळा बाजार दाबण्याचा प्रयत्न संगनमताने केला असल्याचे दिसून आले आहे .
निमडाळे येथील ग्रामस्थांनी मात्र रेशन दुकानदार यांनी जिजामाता महिला मंडळ स्वस्त धान्य दुकान नं ५८ येथून रेशनचा स्वस्त धान्य माल गाडीत भरत असल्यापासून ते थेट धुळे पोलीस स्टेशन पर्यंत पुरवठा अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेला प्रकार कॅमेऱ्यात कैद केला आहे. रेशनचा माल काळ्या बाजारात घेवून जात असताना वाहन सापडल्यास त्या घटनेवरून कलम ३ व ७ नुसार कारवाई करणे अपेक्षित असताना तहसीलदार धुळे ,जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी शासकीय कामांत हलगर्जीपणा व हयगय केली असल्याचे लक्षात येते .
रेशन धान्याचा झालेला सर्व गैरप्रकार व गैरकारभार लवकरच न्यायासाठी जिल्हाधिकारी धुळे यांच्या समोर व जनतेसमोर सोशल मिडियाच्या माध्यमातून ठेवण्यात येणार असल्याचे निमडाळे येथील युवकांनी सांगितले.
निमडाळे येथील स्वस्त धान्य माल काळया बाजारात घेवून जाणारी गाडी पकडून देखील गुन्हा दाखल का करण्यात आला नाही ? या गैरकारभारात धुळे तहसील ,जिल्हा पुरवठा विभाग यातील देखील काही अधिकारी यांचा तर हात नसेल ना ? असा प्रश्न जनतेसमोर उभा राहिला आहे.
शासनाचा स्वस्त धान्य माल गरिबांसाठी का ? रेशन दुकानदारांची पोट भरण्यासाठी ? असा सवाल जनतेने निर्माण केला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

मिलि बघत हाहे यांची
उत्तर द्याहटवा