Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ३ मे, २०२१
Home
/
Unlabelled
/
स्व. तपनभाई पटेल युवा मंच शिरपूर च्या वतीने रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद..! असंख्य रक्तदात्यांनी रक्तदान केले.
स्व. तपनभाई पटेल युवा मंच शिरपूर च्या वतीने रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद..! असंख्य रक्तदात्यांनी रक्तदान केले.
शिरपूर प्रतिनिधी:कोविड-१९ कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सर्वत्र पसरत असून रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे. यासाठी स्व. तपनभाई पटेल युवा मंच शिरपूर चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते पुढे सरसावले. त्यांनी शिरपूर शहर रक्तदाता ग्रुप, मुकेशभाई पटेल ब्लड बँक व दीसान ग्रुप यांच्या सहकार्याने कोरोनाग्रस्त व थॅलेसेमिया बाबत रक्तदान शिबिराचे आयोजन केले. शिरपूर शहरातील आर. सी. पटेल मराठी प्राथमिक विद्यालय हिरानगर येथे रक्तदान शिबिराचे रविवारी दि. २ मे रोजी आयोजन आले.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिबिरास आ. काशिराम पावरा, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष राजगोपाल भंडारी, जनकभाई पटेल, एस. व्ही. के. एम. हॉस्पिटल प्रकल्प संचालक गुलाबराव गुजर, भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी, भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, भाजपा माजी जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर नरेंद्र पाटील, शिक्षक रमेश शिरसाठ, भाजपा शहराध्यक्ष हेमंत पाटील, तेली समाज प्रदेश उपाध्यक्ष शामकांत ईशी, भुरा राजपूत, वासुदेव देवरे, संतोष माळी, राजेश सोनवणे, सुनील चौधरी, राजेंद्र पाटील, अमोल पाटील, ऍड. शाम पाटील, पीपल्स बँक संचालक संजय चौधरी, सामाजिक कार्यकर्ते भालेराव माळी, सामाजिक कार्यकर्ते पंडित पाटील, योगेश चौधरी, वनावल सरपंच मनोहर देवरे, राज देशमुख, विनायक कोळी, अनिल पाटील, किशोर चव्हाण, राजवर्धन पवार, अतुल पाटील, चंद्रशेखर राजपूत व अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन पंडित पाटील, रमेश शिरसाठ, संदीप कुवर, किशोर चव्हाण, राजवर्धन पवार, योगेश्वर माळी, महेश राजपूत, कैलास कोळी, निलेश पाटील, हरीश गुजर, अजिंक्य शिरसाठ, भूषण गुजर, अजय सावळे, निशांत पाटील, आकाश तपासे, सावन सोनवणे, अमोल पाटील, प्रणव भदाने, मयुर कोळी, समर्थ चौधरी, पारस सोनार, दिपक ठाकूर यांनी केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा