Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ३० मे, २०२१
Home
/
Unlabelled
/
पाल परिसरातं चक्रीवादळासह जोरदार पाऊस..केळी पीक जमिन दोस्त अनेक घराची पत्रे उडाली सुदैवाने जीवित हानी टळली..!
पाल परिसरातं चक्रीवादळासह जोरदार पाऊस..केळी पीक जमिन दोस्त अनेक घराची पत्रे उडाली सुदैवाने जीवित हानी टळली..!
प्रतिनिधी-जळगांव:-दि.२९ हमीद तडवी
पाल ता.रावेर आज 29 जून रोजी परिसरात दुपारी ३ वा. च्या सुमारास अचानक चक्रीवादळ सह जोरदार पाऊस झाला. याने केळी पिक जमीनदोस्त होऊन लाखो चे नुकसान झालं तसेच अनेक घरावरील पत्रे उडून घराचेही नुकसान मोठया प्रमाणात झाले.
सातपुडा विकास मंडळ संचलित मराठी शाळेवरील पत्रे उडून विद्युत तारांवर अटकले यात सुदैवाने जीवित टळली असून
पत्रकार मनीस बाविस्कर ,यांचे घरावरील आणि दुकानावरील पत्रे उडून संपूर्ण पाणी घरात शिरल्याने घरातील कम्प्युटर,कुलर,ज्वारी,गहू,अन्नधान्य चे नुकसान झाले तसेच,देवसिंग भिकुसिंग पारधी यांच्या घरावरील पत्रे ही उडाल्याने त्यांची पत्नी सूनदबाई जखमी झाले.व ग्रामीण रुग्णालय समोरअसलेला जीर्ण अंजन झाड उन्मळून पडले सुदैवाने झाड विरुध्द दिशेने पडल्याने मोठा अनर्थ टळला,डॉक्टर आणि कर्मचारी दवाखान्यातच उपस्थित होते.तसेच अनेक ठिकाणी विद्युत तार तुटून पडल्याने लाईट बंद झाली.
त्याचबरोबर
मंजुळा धनराज धांडे आणि प्राजक्त धांडे यांचे सहा एकर वरील नवती केळी पूर्ण जमीनदोस्त झाली.तसेच
विजय मानसीं पवार,गणेश मानसिंग पवार, यांचे दोन हेक्टर वरील केळी ही जमीनदोस्त झाली,करणसिंग शँकर जाधव,राजू एकनाथ चौधरी, विकास खेमसिंग चव्हाण भीमसिंग चतरु चव्हाण,कमील नामदार तडवी यांच्या केळी,मनीस बाविस्कर,विजय पारधी मुक्कदर तडवी,लक्ष्मण गमा राठोड, कमरुद्दीन खान प्रकास राठोड,जुंमा अरमान तडवी, इत्यादी लोकांचे घराचे नुकसान तर अर्जुन रतनसिंग जाधव यांच्या घरासमोर उभा असलेला टॅक्टरवर झाड पडल्याने चक्काचूर झाले.तरी लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई तथा शासनाकडून आर्थिक मदत मिळण्याची अपेक्षा नागरिकांनी केली आहे.
गुलाब वाडी येथेही केळी व घराचे नुकसान
रघुनाथ प्रल्हाद कोल्हे,एकनाथ रोहिदास,पावर,चरत रोहिदास पवार,वसंत, श्रावण पवार,लक्ष्मण पवार यांचे केली पिकाचे नुकसान तर प्रकास राठोड,राजू चव्हाण,सुनील झमु पवार,लखीचंद रातजोड,नवलसिंग,सुकलाल,दारासिंग,भुरा,चव्हाण,मोहनसिंग पावरा, हंसराज पवार,यांच्या घरावरील पत्रे उडून नुकसान
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा