Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ७ मे, २०२१
सोनारी येथे भैरवनाथ कोविड केअर सेंटरचे, आ.सावंत यांच्या हस्ते उदघाटन...
परंडा(राहूल शिंदे) दि.6 तालुक्यातील सोनारी येथे भूम-परंडा-वाशी मतदारसंघाचे आमदार प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांच्या हस्ते 51बेडचे भैरवनाथ कोविड केअर सेंटरचे उदघाटन संपन्न झाले.
तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.आरोग्य यंत्रणेवर मोठ्याप्रमाणात ताण वाढला होता.रुग्णांवर वेळेवर व चांगल्या प्रकारे उपचार करण्यासाठी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे कोविड सेंटर महत्त्वाचे ठरणार आहे.
तालुक्यातील वाढत्या रुग्ण संख्येमुळे सोनारी येथील श्री.काळ भैरवनाथ मंदिराची भक्त निवास इमारत रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आली असून त्या ठिकाणी नवीन कोविड केअर सेंटर सुरू केले आहे.या ठिकाणच्या रुग्णांना सर्व सोई-सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.तसेच अनुभवी डॉक्टर,नर्स,वार्ड बॉय असणार आहेत.
यावेळी माजी आ.ज्ञानेश्वर पाटील, जि.प उपाध्यक्ष धनंजय सावंत, जि.प.कृषी,पशुसंवर्धन सभापती दत्ता साळुंके,शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा.गौतम लटके , माजी नगराध्यक्ष सुभाषसिंह सदीवाल, पंचायत समिती सभापती प्रतिनिधी सतीश दैन, सावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र घोगरे सर, सोनारीचे माजी सरपंच नवनाथ जगताप, तहसीलदार अनिलकुमार हेळकर , तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सय्यद, श्री.काळ भैरवनाथ मंदिर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त संजय महाराज पुजारी आदी उपस्थितीत होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा