या जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार करण्यासाठी तज्ञ डॉक्टरांची टीम असणार आहे.संपूर्ण मोफत औषधउपचार, मोफत एक्स रे , कोविडच्या वेगवेगळ्या आठ रक्त चाचण्याची मोफत तपासणी , उत्तम दर्जाचा नाष्टा, दोन वेळेस जेवण आणि चहा,पिण्यासाठी शुध्द पाणी , प्रशिक्षित योग टीचर , हवेशीर व प्रशस्त कॅम्प , प्रत्येक तीन रुग्णांसाठी शक्य आहे तो पर्यंत स्पेशल रूम अशा विविध सुविधा असणार आहेत.
Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ७ मे, २०२१
Home
/
Unlabelled
/
भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बार्शी येथे 1000 बेडची व्यवस्था असणारे कोविड केअर सेंटरचे उद्घाटन संपन्न...
भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बार्शी येथे 1000 बेडची व्यवस्था असणारे कोविड केअर सेंटरचे उद्घाटन संपन्न...
बार्शी (राहूल शिंदे)दि.7 येथे भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी 1000 बेडची व्यवस्था असणारे जम्बो कोविड केअर सेंटरचे उद्घाटन शिवसेना नेते, महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री मा.आ.एकनाथजी शिंदे व शिवसेना सचिव मा.मिलिंदजी नार्वेकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
धाराशिव व सोलापूर जिल्ह्यतील जनतेच्या सेवेसाठी या ठिकाणी सुसज्ज कोरोना केअर सेंटर व्हावे म्हणून माजी जलसंपदामंत्री तथा भूम-परंडा-वाशीचे विद्यमान आमदार .प्रा.डॉ.तानाजीराव सावंत करत असलेल्या प्रयत्नांना आज यश आले आहे.
भूम-परंडा-वाशी मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ. प्रा. तानाजीराव सावंत यांच्यासह याप्रसंगी धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर, उमरगा-लोहारा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले,बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत, मा.आमदार ज्ञानेश्वर पाटील, प्रा.शिवाजीराव सावंत मा.आमदार दिलीप सोपल, राजेंद्र मिरगणे, भाऊसाहेब आंधळकर, जि.प.उपाध्यक्ष धनंजय सावंत, प्रशांत चेडे, संजय गाढवे, दत्ता साळुंखे, अनिल सावंत, असिफ तांबोळी, सुरज साळुंके,सावंत प्रतिष्ठानचे रामचंद्र घोगरे सर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
या जम्बो कोविड सेंटरचा धाराशिव व सोलापूर जिल्ह्याला मोठा फायदा होणार आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा