यावेळी बोलताना सिद्धार्थ सावंत म्हणाले की, जगातील सर्व बौद्ध धर्मीयांच्या महत्वाचा व आनंदाचा व मंगल दिन म्हणजे वैशाखी पोर्णिमा वैशाखी पोर्णिमा हा दिन संपुर्ण जग भर बुद्ध जयंती म्हणुन साजरा केला जातो.
तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जिवनामधे वैशाखी पोर्णिमे दिनी तीन मंगल मय घटना घडल्या आहेत तथागत गौतमबुद्ध म्हणजेच सिद्धार्थ यांचा जन्म कपिलवस्तु नगरीचे राजे शुद्धोधन यांच्या घरी राणी महामाया यांच्या पोटी झाला . तसेच वैशाखी पोर्णिमे दिनी अथक प्रयत्न व साधने नंतर तथागतांना ज्ञान प्राप्ती झाली, तसेच वैशाखी पोर्णिमेला कुशिनगर येथील शालवनात दोन शाल वृक्षांच्या मध्ये तथागतांचे महा परिनिर्वाण झाले, या तीन गोष्टी वैशाख पोर्णिमेला घडल्या म्हणुन जगाला सत्य अहिंसा शांतता व सदाचाराचा मार्ग दाखवणारे मार्गदाते तथागत भगवान बुद्ध यांची जयंती जगभरात साजरी केली जाते.यादिवशी सर्व उपासक उपासिका विहारात जाऊन बौद्ध पुजापाठ करतात व प्रवचणे सभा संमेलने आयोजित करतात आशा या मंगल दिनी आपन सर्वांनी तथागतांनी दाखवलेला मार्ग व धम्मा प्रमाणे आचरण करावे.
Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २७ मे, २०२१
चिंचपूर(बु) येथील बुध्द विहारात बुध्द जयंती साजरी...
परंडा (राहूल शिंदे) दि.27 तालुक्यातील चिंचपुर बु (सावंतवाडी) येथे सन्मार्ग जागृती मंडळ व जागृती फाऊंडेशन च्या वतीने बुद्ध जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी सन्मार्ग जागृती विहारा मधे तथागत भगवान गौतम बुद्ध , छत्रपती शिवाजी महाराज , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन नितीन सावंत उपसरपंच चिंचपुर बु यांचे वतीने करण्यात आले व जागृती फाऊंडेशनचे सचिव श्रामणेर बोद्धाचार्य केंद्रिय शिक्षक आयु सिद्धार्थ नवनाथ सावंत यांनी बौद्ध वंदना घेऊन उपस्थितांना वैशाखी पोर्णीमे बदद्ल माहीती व मार्ग दर्शन केले.
यावेळी श्रामणेर विश्वास सावंत , तसेच जिवन सावंत ,राहुल सावंत , हनुमंत सावंत , आनंद सावंत , संविधान सावंत , उषा सावंत , रोहीणी सावंत , पंचशिला सावंत , सुनिता चव्हाण , व बौद्ध उपासक उपासिका व बालक कोविड-19 च्या सर्व नियमांचे पालन करून उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा