Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २७ मे, २०२१
परंडा तालुक्यात खरीप पूर्व तयारीच्या कामास वेग....
परांडा (राहूल शिंदे)दि.27 तालुक्यातील चिंचपूर (बु) येथे येथे मंडळ कृषी अधिकारी कैलास देवकर याच्या उपस्थितीत खरीप पुर्व नियोजन आढावा बैठक कोविड-19 च्या सर्व नियमांचे पालन करून पार पडली सदर बैठकीमध्ये घरगुती बियाण्यांचा वापर, बी.बी.एफ. यंत्रमार्फत उडीद,मूग सोयाबीन यांची पेरणी करणे व त्याचे फायदे याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पेरणी पुर्वी उगवण क्षमता तपासणी प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले, तसेच पेरणी पुर्वी बियाण्यास अनुक्रमे बुरशीनाशक,कीटकनाशक,जैवक बीजप्रक्रिया करणेबाबत तसेच खत पुरवठा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कृषी पर्यवेक्षक एस.के.माळी, कृषी सहाय्यक पी.एम. देवकर व शेतकरी बांधव उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा