Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १७ जून, २०२१
API प्रकाश पाटलाच्या कार्यकाळात सोनगीर पोलीस ठाणे प्रकाशमय तर परिसरात हिरवळ...!
प्रतिनिधी कापडणे :सोनगीर पोलिस ठाण्याचे पोलीस निरिक्षक प्रकाश पाटीला च्या राज्यात पोलीस ठाणे प्रकाशमय तर कर्मचाऱ्यांनी दैनंदिन काम सांभाळून सोनगीर पोलीस ठाण्याच्या चारही बाजूला झाडे लावून परिसर हिरवागार केला आहे.
पोलीस ठाण्याच्या आवारात रोज झाडांना पाणी देऊन व परिसर चांगला स्वच्छ धुवून स्वच्छ केला जात आहे म्हणून डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पोलीस ठाण्याला झाडांमुळे व कर्मचारी घेत असलेल्या झाडांच्या काळजीमुळे पोलीस ठाण्याला चकाकी आली आहे.सोनगीर पोलीस ठाण्याच्या आवारात चारही बाजूला विविध प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत.
या झाडांची काळजी सहायक पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाने पोलीस ठाण्यातील प्रत्येक कर्मचारी झाडांची काळजी घेत असतो व वेळो वेळी पाणी देणे, परिसरातील घाण काढणे, गवत वेळेवर कापणे आधी कामे केली जात आहेत. यासाठी सोनगीर पोलीस ठाण्याचे कर्मचारी दैनंदिन कामकाजातून वेळ काढून झाडांची काळजी घेत आहेत.डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या पोलीस ठाण्यात नेहमीच सापांचा वावर असतो म्हणून याठिकाणी नेहमी परिसर स्वच्छ ठेवला जातो. सोनगीर पोलीस ठाण्याच्या इमारतीला नुकतीच रंगरंगोटी केली गेली असून दररोज पाण्याने परिसर स्वच्छ केला जातो.
परिणामी पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सोनगीर पोलीस ठाण्याच्या आवारातील झाडे व स्वच्छता आकर्षित करीत आहे.मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या या पोलीस ठाण्याला आता हिरवीगार झाडांचा साज चढला असून आता पावसाळा सुरू झाल्यानंतर अजून विविध प्रकारची झाडे लावण्यात येणार असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी दिली.
सोनगीर पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आलेल्या झाडांची काळजी घेण्यासाठी होमगार्ड कर्मचारी व पोलीस कर्मचारी नेहमीच परिश्रम घेत असतात. यातून पोलीस ठाण्याच्या आवारातील झाडे डोलदार झाली असून परिसरात नेहमीच गारवा पसरलेला असतो.म्हणुन स्वाभिमानी मराठी पत्रकार संघांचे धुळे जिल्हा महासचिव समाधान सुनिल देवरे यांनी APi प्रकाश पाटील यांचे कौतुक केले आहे...
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा