Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १६ जून, २०२१

आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने धुळे येथे मा.उपजिल्हा अधिकारी तसेच जि. प. जिल्हा आरोग्य अधिकारी यांना आशा व गट प्रवर्तक यांच्या प्रलंबित मागण्याबाबत शिष्ट मंडळाने निवेदन दिले.



धुळे प्रतिनिधी: दिनांक 16-6-2021रोजी आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने धुळे येथे मा.उपजिल्हा अधिकारी तसेच जि. प. जिल्हा आरोग्य अधिकारी यांना आशा व गट प्रवर्तक यांच्या प्रलंबित मागण्याबाबत शिष्ट मंडळाने निवेदन दिले.मागण्या.
1) आशा व गट प्रवर्तक यांना शासकीय कर्मचाऱ्यांच्या दर्जा द्या 
2)आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना कामाचा  मोबदला भरीव स्वरूपाचा द्या 
3)आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या कुटुंबांना प्राधान्याने आरोग्य सेवा मोफत द्या 
4)करोना  बाबत काम करत असताना मृत्यू पावलेल्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना 50 लाख रुपये( वि मा) इतकी रक्कम ताबडतोब द्या
5) 16-9-2019 च्या शासन आदेशानुसार आशा स्वयंसेविका यांना दोन हजार रुपये केलेली मानधन वाढ ही नियमित द्या
16-9-2019च्या आदेशात दुरुस्ती करत गटप्रवर्तकांना देखील आशा स्वयंसेविका प्रमाणे मानधनात वाढ लागू करा
6) आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना गणवेशाची रक्कम ताबडतोब द्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर दरवर्षी भाऊबीज अदा करा.या प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यात आले शिष्टमंडळाचे नेतृत्व राज्य संघटनेचे उपाध्यक्ष युवराज बैसाने  यांनी केले यावेळी संघटनेचे संघटक सचिव अमोल बैसाने. गट प्रवर्तक ललिता पाटील प्रतिभा टाकूर भावना पाटील उज्वला पाटील विजया आटोले कल्पना वानखेडे सीमा माळी अल्पा सोनगडा माया पाटील उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध