Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १७ जून, २०२१

भाडेवाढीसाठी ट्रक चालक, मालक संपावर,निदर्शने करीत वेधले लक्ष दोन दिवसात निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा..!



धुळे :(प्रतिनिधी) ट्रक चालक व मालक हे भाडेवाढीसह विविध मागण्यांसाठी गेल्या दोन दिवसांपासून संपावर गेले आहेत. आज मातोश्री ट्रक चालक व मालक असोसिएशतर्फे निदर्शने करीत लक्ष वेधण्यात आले. मागण्यांबाबत दोन दिवसात निर्णय घ्यावा. अन्यथा आणखी तिव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही संघटनेतर्फे देण्यात आला आहे.

अवधान औद्योगिक वसाहती जवळ हे आंदोलन करण्यात आले. पेट्रोल-डिझेलच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे. ट्रक चालक व मालकांची परिस्थिती देखील सर्वसामान्यच आहे. त्यामुळे त्यांनाही चालु दरात घर चालविणे कठीण झाले आहे. तरी भाडे वाढ करावी, टनामागे पाच किलोची सुट द्यावी, यासह विविध मागण्यासाठी ट्रक चालक व मालक असोसिएशन दोन दिवसांपासून संपावर आहे.

आंदोलनात मातोश्री ट्रक चालक व मालक वेल्फेअर असोसिएशनचे निलेश पाटील, सावकार देसले, कमलेश पाटील, राकेश वाघ, सोनू मराठे, सोनू तोटे, परमेश्वर शिंदे, रोहित वाघ, समाधान वाघ, रविंद्र भदाणे, सुनिल पाटील आदी सहभागी झाले आहेत.
                                                                                                                                                                                            

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध