Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २१ जून, २०२१
Home
/
Unlabelled
/
आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने धुळे येथे मा.धुळे शहराचे आमदार मा.डॉ फारूक शहा यांची भेट
आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने धुळे येथे मा.धुळे शहराचे आमदार मा.डॉ फारूक शहा यांची भेट
धुळे प्रतिनिधी आज दिनांक 21-6
2021रोजी आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने धुळे येथे मा.धुळे शहराचे आमदार मा.डॉ फारूक शहा यांची भेट घेऊन आपल्या प्रलंबित मागण्या ताबडतोब सोडविण्यात याव्या यासाठी धुळे महानगरपालिका अंतर्गत असलेल्या आशा स्वयंसेविका यांनी भेट घेऊन शिष्टमंडळाने निवेदन देऊन मागण्या संदर्भात सविस्तर चर्चा झाली.
यावर मा.आमदार महोदय यांनी शिष्टमंडळास ठोस आश्वासन दिले की लवकरच माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे तसेच माननीय आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेब यांना भेटून लवकरात लवकर प्रश्न सोडवण्यात यावे यासाठी प्रयत्न करणार आहे तसेच जुलै महिन्यात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात आशा व गटप्रवर्तक यांच्या मागण्याबाबत प्रश्न उपस्थित करणार आहेत अशी माहिती माननीय आमदार फारुख शहा साहेब यांनी दिली.
शिष्टमंडळाचे नेतृत्व संघटनेचे उपाध्यक्ष युवराज बैसाणे यांनी केले.अधिकारी यांना आशा व गट प्रवर्तक यांच्या प्रलंबित मागण्याबाबत शिष्ट मंडळाने निवेदन दिले.मागण्या.
1) आशा व गट प्रवर्तक यांना शासकीय कर्मचाऱ्यांच्या दर्जा द्या
2)आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना कामाचा मोबदला भरीव स्वरूपाचा द्या
3)आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या कुटुंबांना प्राधान्याने आरोग्य सेवा मोफत द्या
4)करोना बाबत काम करत असताना मृत्यू पावलेल्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना 50 लाख रुपये( वि मा) इतकी रक्कम ताबडतोब द्या
5) 16-9-2019 च्या शासन आदेशानुसार आशा स्वयंसेविका यांना दोन हजार रुपये केलेली मानधन वाढ ही नियमित द्या
16-9-2019च्या आदेशात दुरुस्ती करत गटप्रवर्तकांना देखील आशा स्वयंसेविका प्रमाणे मानधनात वाढ लागू करा
6) आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना गणवेशाची रक्कम ताबडतोब द्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर दरवर्षी भाऊबीज अदा करा.या प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यात आले शिष्टमंडळाचे नेतृत्व राज्य संघटनेचे उपाध्यक्ष युवराज बैसाने यांनी केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा