Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २१ जून, २०२१

भारतीय जन सम्राट पार्टी हिंगोली जिल्ह्याची आढावा बैठक संपन्न..!



हिंगोली (प्रतिनिधी) भारतीय जन सम्राट पार्टी हिंगोली जिल्ह्याची आढावा बैठक रविवार दिनांक २० जून २०२१ रोजी संपन्न झाली. या सभेत पक्षाचे हिंगोली जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी पक्षाच्या कामकाजाचा जिल्हास्तरीय आढावा घेण्यात आला . महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पक्षाची जोरदार कामगिरी सुरु असून आगामी होऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणुका पाहता पक्षाने निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने जोरदार तय्यारी सुरु केली आहे असे यावेळी महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख विजय करवंदे यांनी सभेला मार्गदर्शन करतांना आपले विचार व्यक्त केले. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पक्षाच्या आढावा बैठका होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले , जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रातील प्रखर व युवा नेतृत्वाला संधी देणार असल्याचे यावेळी हिंगोली जिल्हा अध्यक्ष मुशीर अब्दुल शेख यांनी सांगितले,या प्रसंगी प्रदेश कार्यकारी सदस्य गणेश गोवींदराव वानखेडे यांनी सुद्धा या सभेला मार्गदर्शन केले .

हिंगोली येथील जैन गल्ली मंदिरात पार पडलेल्या बैठकीत,आसिफ सय्यद जिल्हा उपाध्यक्ष, संतोष हाराळ जिल्हा उपाध्यक्ष, संतोष आडने  जिल्हा सचिव,किशोर अण्णा चौधरी जिल्हा सदस्य,कैलास दादा शिरसागर  जिल्हा सदस्य,राजु दादा खंडागळे जिल्हा सदस्य,शंकर खंडागळे , आजर भाई यांच्या सह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध