Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २६ जून, २०२१
वेल्हाणे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कोविडशिल्ड लसीचे लसीकरण संपन्न..!
धुळे(प्रतिनिधी) धुळे तालुक्यातील वेल्हाणे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र शिरुड व उपकेंद्र वेल्हाणे यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना आजार रोखण्यासाठी कोरोना काळात वेल्हाणे गावातील ग्रामस्थांना कोविडशिल्ड लस देण्यात आली. या लसीकरणाचा पहिला डोस हा 18 ते 44 वयोगटातील नागरीकांना देण्यात आला. वेल्हाणे उपकेंद्राला बुधवार दि.23/06 रोजी राज्य शासनाच्या आदेशानुसार 100 कोविडशिल्ड डोस मिळाले होते.
व वेल्हाणे ग्रामस्थांनी पुर्णपणे सहकार्य करुन 100 नागरीकांनी ही लस घेतली. लस ही पुर्णपणे सुरक्षित असल्याचे नागरीकांनी सांगितले.
लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी नागरीकांनी खुप मोठी गर्दी केली होती. लसीकरण केंद्रावर डॉ.आर.एम.पवार, डॉ.हेमंत निमोनकर, डॉ.हिना शेख, डॉ.गंवाडे मॅडम, डॉ.घुले मॅडम, संगिता मराठे, कल्पना बोरसे व कर्मचारी वर्ग आणि जिल्हा परिषद शिक्षिका उपस्थित होत्या.
(प्रतिनिधी:-जयदिप लौखे-मराठे,धुळे)
मी स्वतः कोविडशिल्ड लस घेतली असून ती पुर्णपणे सुरक्षित आहे.तरी सर्व नागरीकांनी ही लस घ्यावी. व प्रशासनाला सहकार्य करावे. वेल्हाणे गावाला अजुन काही दिवसात लस मिळवण्यासाठी शंभुसेनेच्या माध्यमातून प्रयत्न करेल. हा विश्वास देतो.जयदिप लौखे-मराठे(युवा धुळे जिल्हाध्यक्ष शंभुसेना युवा आघाडी)
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा