Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २६ जून, २०२१

शिरपूरात गरताड फाट्यावर भाजपा तर्फे 'चक्का जाम' आंदोलन ओबीसींच्या रक्षणार्थ यापुढे तिव्र आंदोलन करण्यात येईल : बबनराव चौधरी



शिरपूर प्रतिनिधी : ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण घालवणाऱ्या आघाडी सरकारच्या नाकर्त्या कारभारा विरोधात शिरपूर भारतीय जनता पार्टी तर्फे दि.२६ जून रोजी गरताड फाटा या ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आले. भारतीय जनता पार्टी प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांचा नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी जि.प.अध्यक्ष तुषार रंधे,माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण,भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील,कृउबा समिती सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया,पं.स. सभापती सत्तारसिंग पावरा,माजी जिप उपाध्यक्ष के.डी.पाटील,देवेंद्र पाटील, माजी कृउबा समिती सभापती लक्ष्मण पाटील, नारायण चौधरी, भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, माजी उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. जोपर्यंत ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तो पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेऊ नयेत अशी मागणी ही करण्यात आली. नाकर्त्या राज्य सरकारने ठोस पाऊल उचलले असते, तर ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण गमाविण्याची वेळच आली नसती. फडणवीस सरकारने तातडीने हालचाली केल्यामुळेच त्यावेळी हे आरक्षण वाचले. मात्र त्या नंतर आघाडी सरकारने आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही वेळेत पूर्ण केली नाही. आघाडी सरकारमधील मंत्री आरक्षणाच्या मुद्द्याचा निकाल लागेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही अशी वक्तव्ये करतात. मात्र राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जाहीर केल्या तरी आघाडी सरकार मधील मंत्री गप्प आहेत. या मंत्र्यानी राजीनामा देवुन सरकारमधुन बाहेर पडावे असे आवाहान हि भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांनी यावेळी केले. सुप्रीम कोर्टाचा निकाल येऊन दोन महिने लोटले तरी सरकारने ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण परत मिळवून देण्यासाठी काही हालचाली केल्या नाहीत. राज्य सरकारच्या निष्क्रियतेमुळेच राज्य निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या.  आघाडी सरकारचे मंत्री निवडणुका होऊ देणार नाहीत, असे फक्त म्हणत राहिले. आता आम्ही यासाठी दि. 26 जूनला या ठिकाणी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले आहे. 

यापुढे तिव्र आंदोलन करण्यात येईल अशा इशारा हि त्यांनी यावेळी दिला. जि. प. सदस्य योगेश बादल, नगर सेवक दिपक माळी,भुरा राजपूत,पिंटू शिरसाठ, अॅड. प्रताप पाटील,भटू आप्पा माळी, विक्की चौधरी,मंगेश भदाणे, जितेंद्र सुर्यवंशी, सुनिल चौधरी,डाॅ.शशिकांत गुजर,शामकांत ईशी,महेंद्र पाटील,पिंटू माळी,रविंद्र माळी,छगन माळी,छगन गुजर, भटू माळी,भरत पाटील,अविनाश पाटील, नितीन राजपूत, दरबार जाधव, राजेंद्र चौधरी, योगेश सिसोदिया,संजय चौधरी, भालेराव माळी,बबन भिल,अमोल पाटील, नरेंद्र पाटील, राजेंद्र पाटील,केशव माळी, सुनिल माळी,अवधुत मोरे,मोहन पाटील, दर्यावरसिंग जाधव, मुबीन शेख,रफीक तेली, अविनाश शिंपी,जगन पाटील, राजुलाल मारवाडी,भुपेश परदेशी, मनोज पंडीत,मंजित पवार, सुभाष राजपूत, दिपक पावरा, शिवाजी बडगुजर,बिपीन तेले,अनिल पाटील,अनिल पाटील,रविंद्र राजपूत,निलेश पाटील,किशोर चव्हाण, नितीन माळी, दिनेश चौधरी,बापू लोहार, राधेश्याम भोई, सतीष गुजर,नारायण माळी, मनोज भावसार, गणेश माळी,प्रमोद पाटील, स्वप्नील पाटील आदि उपस्थित होते.

पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व ओबीसी समाजातील कार्यकर्ते या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध