Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २४ जून, २०२१
शिवसेना पदाधिकाऱ्यावर झालेल्या जीवघेणा हल्ल्याबाबत
शिरपूर प्रतिनिधी:दी.24/06/2021 रोजी शिवसेना शिरपूर विधानसभा तर्फे मा. उपविभागीय पोलिस अधिकारी यांना व पोलीस निरीक्षक शिरपूर पोलीस स्टेशन याना निवेदन देण्यात आले. विषय असा की दी.19/06/2021 रोजी रात्री 10.30 वा शिरपूर शहरात अतिशय निंदनीय व क्रूर अशी घटना घडली ती म्हणजे शहरातील गजबजलेल्या ठिकाणी मच्छी बाजार येथे शिरपूर शहर शिवसेना उपप्रमुख बंटी लांडगे वय 33 यांच्यावर काही अज्ञात इसमांनी धारधार शस्त्रांनी कानाजवळ व पाठीवर जीवघेणा हल्ला केला तो अतिशय गंभीर अवस्थेत धुळे रुग्णालयात उपचार घेत आहे.
अशा हल्लेखोरा विरूध्द कड्क कारवाई व्हावी व यामागील पूर्ण पणे कसून चौकशी करून त्याचा परदा फाश करावा कारण की शांत शिरपूर शहर अशी ख्याती असलेल्या आपल्या शहराला काळीमा फासणारी हि घटना घडलेली आहे आणि गुन्हेगारांचा बाबत काही कसर राहिली तर या पुढे कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न या शहरात निर्माण होऊ शकतो. तरी या प्रकरणावर सखोल चौकशी व्हावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
यावेळी उपस्थित भरतसिंग राजपूत शिवसेना उपजिल्हाप्रमुख धुळे, जील्हासंघटक विभा जोगराना, तालुका प्रमुख दीपक चोरमले,आत्तरसिग पावरा, राजू टेलर,देवेंद्र पाटील,अभय भदाने, मनोज धनगर, योगेश ठाकरे,मसूद शेख, रवींद्र जाधव,नितीन सोनार,जितेंद्र राठोड, मंगल भाई,अर्चना देसले, वीणा वैद्य, जितेंद्र पाटील, तुषार महाले,सुकलाल पावरा, सागर बारी, दिगंबर राठोड,दिनेश पाटील, गणेश,विजु,सचिन,सूनील,विक्की ,राहुल पदाधिकारी, शिवसैनिक व भरतसिंग नगर येथील रहिवासी आणि विषेतः महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा