Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २१ जून, २०२१
जितेंद्र पावरा यांची बिरसा फायटर्सच्या धुळे जिल्हा युवक अध्यक्ष पदी निवड..!
शिरपूर प्रतिनिधी: जितेंद्र पावरा यांची बिरसा फायटरच्या धुळे जिल्हा युवा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
सुशिलकुमार पावरा संस्थापक अध्यक्ष बिरसा फायटर्स यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 20 जून 2021 रोजी बिरसा फायटर्स पदग्रहण ऑनलाईन सोहळासाठी झूम सभा आयोजित करण्यात आली होती.
जितेंद्र पावरा यांची बिरसा फायटर्समध्ये काम करण्याची तिव्र इच्छा बघून सभेत जितेंद्र पावरा यांना धुळे जिल्हा युवक अध्यक्ष पदाची घोषणा सुशिलकुमार पावरा संस्थापक अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी केली.सभेत महाराष्ट्र राज्यकार्यकारणी सोबतच विभागीय कार्यकारणी पदे,जिल्हा कार्यकारणी पदे,तालुका कार्यकारणी पदे निवड करून जाहीर करण्यात आली.
या सभेला केशव पवार महानिरीक्षक,
कार्याध्यक्ष नंदलाल पाडवी,कोषाध्यक्ष दादाजी बागूल, राज्य प्रवक्ता रोहीत पावरा,सल्लागार अॅड.जगदीश पावरा,अॅड.रमेश पावरा,महिला प्रतिनिधी चंद्रभागा पवार,राज्यसदस्य मनोहर पाडवी,देवीदास वसावे,अशोक वळवी,
अर्जून जाधव,सांगली जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाडवी,ठाणे जिल्हाध्यक्ष सतिश जाधव,नाशिक जिल्हाध्यक्ष दिपक सोनवणे,जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल गायकवाड,महासचिव उमाकांत कापडनीस, महेश्वरी कापडणीस नाशिक महिला प्रतिनिधी,बागलाण तालुका अध्यक्ष आकाश पवार,विभाग प्रसिद्धीप्रमुख प्रितेश पावरा,नंदुरबार प्रसिद्धी प्रमुख गणेश खर्डे, शहादा तालुका अध्यक्ष संतोष वळवी,
तळोदा तालुका अध्यक्ष सुभाष पावरा,मुंबई जिल्हाध्यक्ष संदिप रघतवान,विपूल वळवी, विजय सहारे इत्यादी बिरसा फायटर्सचे पदाधिकारी बांधव उपस्थित होते.
आदिवासी समाजाच्या युवकांना आपण संघटीत करणार व सामाजिक कार्य करणार असल्याचे मत यावेळी नवनियुक्त युवा जिल्हाध्यक्ष धुळे जितेंद्र पावरा यांनी व्यक्त केले आहे.
जितेंद्र पावरा यांची बिरसा फायटर्सच्या युवक जिल्हाध्यक्ष धुळे पदी निवड झाल्याबद्धल उपस्थित पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच आदिवासी बांधवांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा