Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २५ जून, २०२१
धुळे येथील प्रभात नगर येथे वट पौर्णिमा उत्सव साजरा उत्साहात संपन्न..!
धुळे प्रतिनिधी:प्रभावर्ष २०२१ या वर्षात २४ जून गुरूवारी म्हणजे आज वट सावित्री पूजन आहे.पतीच्या प्राणांचे रक्षण व्हावे आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे, यासाठी सुवासिनी महिला पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीसारखे व्रत आचरतात. सावित्रीने आपल्या पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली. तेथेच यमदेवांनी सत्यवानाला त्याचे आयुष्य परत दिले.
त्यामुळे वडाच्या झाडाचे पूजन केले जाते. ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा नावाने ओळखली जाते. सुवासिनी महिला या दिवशी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात. वास्तविक पाहता वटसावित्रीचे व्रत हे तीन दिवसीय व्रत असते. ज्या महिलांना संपूर्ण तीन दिवस व्रत करणे शक्य नाही, त्या महिलांनी केवळ वटपौर्णिमेच्या दिवशी विधिवत हे व्रत आचरावे, असे शास्त्रात सांगण्यात आले आहे.
महिलांसाठी हा आनंदाचा आणि नाट्टा थट्टा करण्याचा दिवस आजच्या दिवशी महिला उपवास करून छान नटून थटून वडाच्या झाडाची पूजा करतात. वर्षातून एकदा येणारा हा सण महिला खुप आनंदात साजरा करतांना ललिता देसले, शितल देसले, ऋतुजा देसले, सविता माळी, हेमांगी माळी, श्यामाल भडागे व परिसरातील महिला मिळून उपवासाचा आनंद घेतला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा