Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ८ जून, २०२१
Home
/
Unlabelled
/
चुंचाळे येथील लोकनियुक्त सरपंच सुनंदा संजय पाटील यांच्या विरूध्द अविश्वास प्रस्ताव पारीत.
चुंचाळे येथील लोकनियुक्त सरपंच सुनंदा संजय पाटील यांच्या विरूध्द अविश्वास प्रस्ताव पारीत.
तरुण गर्जना:यावल दि.७ जुन रोजी तालुक्यातील चुंचाळे येथील लोकनियुक्त सरपंच सुनंदा पाटील यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव आज दि.७ सोमवार रोजी पारीत झाला. ग्रामपंचायत कार्यालयात तहसिलदार यांनी घेतलेल्या विशेष सभेत ग्रामपंचायतीचे उपसरपंच सहित ९ सदस्यांनी अविश्वासाच्या बाजुने मतदान करीत ९ विरूध्द १ असा प्रस्ताव पारित झाला.
चुंचाळे ता.यावल येथील लोकनियुक्त सरपंच सुनंदा संजय पाटील या ३ वर्षापूर्वी डिसेंबर २०१७ मध्ये सरपंच पदावर विराजमान झाल्या होत्या.तर गेल्या काही महिन्यापासून सरपंच पाटील या उपसरपंच व सदस्यांना विश्वासात घेऊन कामकाज करत नाही म्हणून ३१ मे रोजी येथील तहसील कार्यालयात त्यांच्या विरूध्द अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता.
प्रस्तावावर सोमवारी तहसिलदार महेश पवार यांच्या उपस्थितीत चुंचाळे ग्रामपंचायतीत सायंकाळी ४ वाजेला विशेष सभा घेण्यात आली.
या सभेत सरपंच यांच्या विरूध्द उपसरपंच कु.नाजिमा अन्वदर तडवी सह सुकलाल यशवंत पाटील,अनिल पंडीत कोळी,अरमान मन्वर तडवी, दगडू किताब तडवी,प्रा.शारदा सुधाकर चौधरी,सौ.नोंसाद सायबु तडवी,सौ.जयनूर संजय तडवी,व सौ.सिंधुबाई संजय पाटील यांनी मतदान केले व ९ विरूध्द १ असा अविश्वास प्रस्ताव पारीत झाला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा