Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ५ जून, २०२१
शिंदखेडा तालुक्यातील अक्कडसे गावाच्या तापी नदी पात्रातून बेकायदा वाळू उपसा
तरुण गर्जना:शिंदखेडा प्रतिनिधी:शिंदखेडा महसूल प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अक्कडसे गावाच्या तापी नदी पात्रातून बेकायदा वाळू उपसा होत आहे.बेकायदा रेती उपसा करणाऱ्या रेती माफियांवर कायदेशीर कारवाई करण्याकामी शासनाने सूचना व आदेश दिलेले असताना शिंदखेडा महसूल प्रशासनाने मात्र महाभारतातील धूर्तराष्ट्र राजा प्रमाणे डोळ्यावर पट्टी बांधून बघ्याची भूमिका घेतली आहे.याबाबत स्थानिक माजी सरपंच मिलिंद सोनवणे यांनी जिल्हाधिकारी व खनिकर्म अधिकारी धुळे यांच्याकडे तक्रारारी केलेल्या आहेत.
अक्कडसे गावालगत असलेल्या तापी नदी पात्रातून वेळोवेळी रेती घाट लिलाव झालेले असल्याचे देखील नागरिकांनी सांगितले आहे.रेती घाट लिलाव झालानंतर शासनाने ठेकेदारांना रेती उचल करण्यासंदर्भात मार्गदर्शक सुचना दिलेल्या असतांना त्या सुचना व आदेशांचे ठेकेदार यांनी पालन केलेले नसल्याने नदी पात्रात दहा ते पंधरा फुट खोल असे डोह तयार झाले आहेत. तसेच शासनाचा २६,११,१७ च्या फार्मुल्याचे काय ? रेती घाटावरील रेती उचल झाल्यानंतर करण्यात येणाऱ्या उपाय योजना देखील ठेकेदार यांनी केलेल्या नसल्याने आजही तिथून बेकायदेशीर रेती उपसा सुरूच आहे.
रेती उपसा करत असतांना स्थानिक महसूल कर्मचारी यांच्यावर जबाबदारी सोपिविण्यात आलेली असतांना बेकायदा वाळू उपसा होतोच कसा ? याबाबत सवाल उपस्थित राहतो.महसूल प्रशासनाच्या अप्रत्यक्ष पाठबळाशिवाय बेकायदा रेती उपसा होणे शक्य नसल्याने महसूल प्रशासनाच्या कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित होत आहे ? या साखळीत महसूल प्रशासनाचा शेवटचा कर्मचारी कोतवाल ते जिल्ह्याचे प्रथम जिल्हाधिकारी धुळे यांनी त्यांची कर्तव्ये नियमानुसार पार पाडलेली नसल्यानेच रेती माफियांचा खेळ गावांत व जिल्ह्यात सरास सुरु आहे.
बेकायदा व नियमबाह्य होणाऱ्या रेती उपसा मुळे स्थानिक भोई व कोळी समाजाच्या लोकांच्या उपजीविकेवर परिणाम होत आहे.शेतीला लागणारे पाण्याची पातळीदेखील दिवसेंदिवस खोल जात आहे. या अन्याया विरोधात स्थानिक लोक जनता लढा देणार असून न्याय मिळण्यासाठी सनदशीर मार्गाने संघर्ष करणार असल्याचे आमच्या प्रतिनिधीला सांगितले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा