Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २२ जून, २०२१

शिरपूर आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलात जागतिक योग दिवस उत्साहात संपन्न..!



शिरपूर प्रतिनिधी:आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलात जागतिक योग दिवस उत्साहात संपन्न… जागतिक योग दिवस ऑनलाईन उपक्रमात संस्थेच्या एकूण ८४० कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला व ५०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी ऑफलाईन योग अभ्यासाचा सदर दिवशी आनंद घेतला.

कोविड-१९ चा प्रादुर्भाव म्हणून संस्थेने यावर्षी संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन योग वर्गाचे आयोजन करण्यात आले. जागतिक योग दिवस ऑनलाईन उपक्रमात संस्थेच्या एकूण ८४० कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला व ५०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी ऑफलाईन योग अभ्यासाचा सदर दिवशी आनंद घेतला.

ऑनलाईन उपक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी यांनी सर्व कर्मचाऱ्यांना जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच योग ही काळाची गरज असून सर्वांनी नियमित योगा अभ्यास करावा यासाठी सर्वांना आग्रह केला.


सदर ऑनलाईन योग वर्गात सर्व कर्मचाऱ्यांकडून ओमकार, प्रार्थना, विविध योग प्रकार, मुद्रा अभ्यास, शुद्धिक्रिया, प्राणायाम, ध्यान, आसने, संकल्प असा एक तासाचा योग अभ्यास शास्त्रशुद्ध पद्धतीने करून घेण्यात आला. जागतिक योग दिवस ऑनलाईन योग वर्गाचे नियोजन व आयोजन संस्थेचे सीईओ डॉ. उमेश शर्मा व क्रीडा विभाग प्रमुख प्रितेश पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा समन्वयक राकेश बोरसे, सर्व क्रीडा प्रशिक्षक, तांत्रिक विभागाचे विभाग प्रमुख सचिन जाधव व सहकारी यांनी केले. योग वर्गाच्या समापन प्रसंगी सीईओ डॉ. उमेश शर्मा यांनी सर्व कर्मचाऱ्यांना जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या व आरोग्याबद्दल मार्गदर्शन केले. सहभागी सर्व सदस्यांना संस्था स्तरीय सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध