Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ७ जून, २०२१
जि.प.वनावल गटातील बोरगाव येथे विविध कामांचा भूमिपूजन शुभारंभ
शिरपूर प्रतिनिधी:जिल्हा परिषदेच्या 3054 या योजनेतून वनावल गटातील जि. प. सदस्या सौ अभिलाषा भरत पाटील यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे बोरगाव शिवारातील शेतरस्ता व जिल्हा परिषद शालेय शिक्षण समिती मधून मराठी शाळेची नवीन वर्ग खोली मंजूर केली होती. ह्या कामांचा भूमिपूजन शुभारंभ शिसाका संचालक तथा माजी पं स. सदस्य भरत भिलाजी पाटील, पं स.चे माजी उपसभापती जगतसिंग राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत व गावाचे उपसरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच पार पडला.
माजी शिक्षण मंत्री श्री अमरिशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा, शिरपूर न.प. उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, जि. प. अध्यक्ष तुषार रंधे, उपाध्यक्ष सौ कुसुम कामराज निकम, जि. प. शिक्षण सभापती सौ मंगला सुरेश पाटील, माजी नगरसेवक अशोक कलाल, माजी नगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण यांच्या सहकार्यातुन व मार्गदर्शनाखाली वरील कामे मंजूर करण्यात आली.
बोरगाव शिवारात बोरगाव, जातोडा तसेच हिंगोणी येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत. पावसाळ्यात शेतात जाण्यासाठी शेतकरयांना खूपच त्रास सहन करावा लागत होता. आता शेतरस्ता बनणार असल्या मुळे परिसारातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
तसेच गावातील जि.प. मराठी शाळेतील वर्ग खोली पावसाळ्यात गळत होती व एका नवीन वर्ग खोलीची पण आवश्यकता होती. आता नवीन वर्ग खोली मंजूर झाली असून एका वर्ग खोलीचे दुरुस्तीकरण पण होणार आहे म्हणून ग्रामस्थांच्या जुन्या मागणीचा पाठपुरावा करून मंजूर केल्यामुळे जि प सदस्या सौ अभिलाषा भरत पाटील यांचे ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.
भूमिपूजन शुभारंभ प्रसंगी पं. स. माजी सदस्य निलेश विश्वासराव पाटील, सरपंच सौ काशीबाई तानकु भिल, माजी सैनिक दगेसिंग राजपूत, विकासो चे चेअरमन खंडूसिंग राजपूत, ग्रामसेवक बि. डी. राजपूत, विठ्ठल झुलाल कोळी, जयराम पाटील, कौतिक न्हावी, तुकाराम न्हावी, गुलाब फुला भिल, पत्रकार अमोल राजपूत गोलू धुडकू भिल, जातोड्याचे शेतकरी सुभाषचंद्र राजपूत, भरत राजपूत, माजी उपसरपंच जयसिंग राजपूत, हिंगोणीचे शेतकरी अशोक पाटील, जितू पाटील, दगडू पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा