Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ७ जून, २०२१
बोरगाव येथे साजरा झाला शिवस्वराज्य दिन
शिरपूर प्रतिनिधी: महाराष्ट्रातील सर्व ग्राम पंचायती, पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदांमध्ये 6 जुन हा 'शिवस्वराज्य दिन' म्हणून साजरा करण्या संदर्भात राज्य सरकारने आदेश पारित केले होते. त्या आदेशान्वये तालुक्यातील बोरगाव येथे ग्राम पंचायत परिसरात 'शिवस्वराज्य दिन' साजरा करण्यात आला.
शिवरायांचा राज्याभिषेकाचा फोटो असलेला झेंडा लावून गुढी उभारण्यात आली आणि राष्ट्रगीत व गर्जा महाराष्ट्र माझा असे गीत गाऊन मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा करण्यात आला.
गावात पहिल्यादाच 'शिवस्वराज्य दिवस' साजरा होत असल्याकारणाने ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती.
यावेळी उपसरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया, माजी उपसरपंच रजेसिंग राजपूत, शिवसेना शाखाप्रमुख दीपक राजपूत, पोलीस पाटील मनोहर पाटील, वि.का. सोसायटीचे चेअरमन खंडेसिंग राजपूत, ग्रामसेवक बि. डी. राजपूत, हिरालाल पाटील, बाबुराव न्हावी, गोलू धुडकू भिल व ग्रामस्थ उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा