Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २१ जुलै, २०२१

रोहितभाऊ शिंगाणे यांची ग्राहक संरक्षण समिती धुळे जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती..!




धुळे प्रतिनिधी:धुळे जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात नावलौकिक असलेले सामाजिक कार्यकर्ते तथा  बिझनेसमन तसेच भोई समाज सेना प्रदेशाध्यक्ष  मा.रोहितभाऊ शिंगाणे यांची भारत सरकार नोंदणीकृत, माणुसकी सोशल फाऊंडेशन संचलित, ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीच्या धुळे जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. 

मा.दादाभाऊ केदारे,राष्ट्रीय अध्यक्ष यांनी नियुक्ती पत्र पाठवले असून,मा.विनित साळवी राज्य अध्यक्ष,मा.अजिता घोडगावकर राज्य अध्यक्षा यांनी या नियुक्ती बाबत अभिनंदन केले आहे. 

मा.दादाभाऊ केदारे राष्ट्रीय अध्यक्ष, यांनी प्रत्यक्ष फोन करून मा. रोहितभाऊ शिंगाणे यांना सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. 

ग्राहकांना अनेक ठिकाणी कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागते आणि त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यास दिरंगाई होत असते. धुळे जिल्ह्यातील ग्राउंड लेव्हल ला काम करणारे मा.रोहितभाऊ शिंगाणे यांच्या नियुक्तीमुळे धुळे जिल्ह्यातील ग्राहकांना त्यांच्या तक्रारी निवारण्यासाठी एक महत्त्वपूर्ण साथ मिळणार आहे. ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 

या नियुक्ती बद्दल सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी मा.रोहितभाऊ शिंगाणे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

त्यांच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा..!



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध