Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २१ जुलै, २०२१
Home
/
Unlabelled
/
गावांना फाईव्ह स्टार बनवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन पाणी फाउंडेशनतर्फे अमळनेरातील १० गावे सन्मानित..!
गावांना फाईव्ह स्टार बनवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन पाणी फाउंडेशनतर्फे अमळनेरातील १० गावे सन्मानित..!
अमळनेर प्रतिनिधी: पाणी फाउंडेशन व शासकीय योजनांच्या माध्यमातून जास्तीत जास्त गावे समृद्ध झाली पाहिजेत. काही गावांमध्ये चांगली कामे होत आहेत. अशा गावांमुळे प्रशासनालाही हुरूप येतो. पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनीच पुढाकार घेतला पाहिजे. राष्ट्रीय पातळीवर जिल्ह्याचा बहुमान उंचावण्याचे काम अनोरे गावाने केले आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले.तालुक्यातील अनोरे येथील पानी फाउंडेशनच्या माध्यमातून गावांना दिल्या जाणाऱ्या पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते.
लोकनियुक्त सरपंच सौ. सुषमा वासुदेव देसले (पाटील) यांच्या कुशल नेतृत्वात दहिवद गावातील उत्कृष्ट कामगिरी
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी गावांना 'फाइव्ह स्टार' बनविण्याची पंचसूत्री सांगितली. यात शौचालय,घनकचरा व्यवस्थापन, सांडपाण्याचे नियोजन,पिण्याच्या पाण्याची स्वच्छता व वारंवार हात धुण्यास सांगितले.
यावेळी पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक सुखदेव भोसले,जिल्हा कृषी अधिकारी अनिल भोकरे, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, तालुका कृषी अधिकारी भरत वारे, मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले आदी मान्यवर उपस्थित होते.
पाणी फाउंडेशनवर आधारित भजनाच्या माध्यमातून मान्यवरांचे स्वागत झाले. यावेळी तालुक्यातील डांगर बु.तांदळी, गांधली,नगाव बु.गाव खु.पातोंडा,निम, मंगरूळ,दहीवद,अनोरे या गावच्या सरपंच व ग्रामस्थांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
भोसले यांनी समृद्ध गाव स्पर्धेची पुढची वाटचाल विशद केली.जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदीप पाटील यांनी अनोरे गावाचा राष्ट्रीय स्तरापर्यंत झालेला प्रवास, गावातील नागरिकांच्या श्रमाच्या माध्यमातून ३५० हेक्टर क्षेत्राचे पाणी शेतातच कसे
अडविले याची माहिती दिली..यावेळी तालुक्यातील पारितोषिक पात्र गावांचे सरपंच,उपसरपंच,सदस्य,ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते. सुनील पाटील यांनी सूत्रसंचालन केले.भूषण पाटील यांनी आभार मानले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
पती-पत्नीसह दोन मुलांचा रेल्वेखाली मृत्यू; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट अमळनेर, दि. २७ ऑगस्ट २०२६ (गुरुवार) : तालुक्यातील टाकरखेडा येथे...
-
सुरगाणा (नाशिक ) माधव खाबिया :- तालुक्यात रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात आरोग्य विभाग व सुरगाणा पोलिसांनी मोठी धडक मोहीम ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा