Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १६ जुलै, २०२१
अरे बापरे हे काय चोपडा तालुक्यात हेलिकॉप्टर कोसळले ; दुर्घटनेत १ ठार
चोपड प्रतिनिधी: चोपडा तालुक्याती वर्डी शिवारात हेलिकॉप्टर दुर्घटना झाली. यात दोन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर महिला पायलट गंभीर जखमी आहे.
चोपडा तालुक्यातील वर्डी शिवार असलेला भाव हा आदिवासी परिसर आहे. सातपुडा पर्वत रांगेत असलेल्या राम तलाव परिसरात दुर्घटना दुपारी चारच्या सुमारास झाली आहे. दुर्घटना झालेले हेलिकॉप्टर आहे की प्रशिक्षणार्थींचे विमान आहे ही माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
मात्र हेलिकॉप्टर असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात असून, यात दोन जणांचा मृत्यू झाला असून महिला पायलट गंभीर जखमी आहे.आदिवासी परिसर असल्याने येथील आदिवासी बांधवांनी हेलिकॉप्टरमधील जखमी महिला पायलटला बाहेर काढून उपचारासाठी दवाखान्यात नेले. चोपडा तहसिलदार व नायब तहसिलदार घटनास्थळी पोहचत आहेत.
सदर घटना घडली हा परिसर सातपुडा पर्वत रांगेत असून, घनदाट जंगलाचा परिसर आहे. घटनास्थळी पोहचण्यासाठी तीन किलोमीटर पायी जावे लागत असल्याने प्रशासनाची देखील तात्काळ मदत मिळणे कठीण आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
पती-पत्नीसह दोन मुलांचा रेल्वेखाली मृत्यू; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट अमळनेर, दि. २७ ऑगस्ट २०२६ (गुरुवार) : तालुक्यातील टाकरखेडा येथे...
-
सुरगाणा (नाशिक ) माधव खाबिया :- तालुक्यात रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात आरोग्य विभाग व सुरगाणा पोलिसांनी मोठी धडक मोहीम ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा