Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २१ जुलै, २०२१
Home
/
Unlabelled
/
ईदनिमित्त नियमित १ सहस्र जनावरे कापण्याची अनुमती मुंबई उच्च न्यायालयाने नाकारली !
ईदनिमित्त नियमित १ सहस्र जनावरे कापण्याची अनुमती मुंबई उच्च न्यायालयाने नाकारली !
मुंबई उच्च न्यायालय
मुंबई प्रतिनिधी: देवनार येथील पशूवधगृहामध्ये ईदनिमित्ताने २१ ते २३ जुलै या कालावधीत नियमित ३०० मोठी जनावरे कापण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने अनुमती दिली आहे. ही संख्या वाढवून नियमित १ सहस्र जनावरे कापण्यासाठी अनुमती मिळावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. या सुनावणीच्या वेळी ‘मानवी आरोग्यापेक्षा धर्म मोठा नाही’, असे नमूद करत १ सहस्र जनावरे कापण्याची मागणी न्यायालयाने अमान्य केली आहे.
‘महानगरपालिकेने निश्चित केलेली संख्या योग्य आहे.अशा प्रकारे सवलत देणे सर्वसामान्यांच्या हिताचे ठरणार नाही. अन्यथा प्रशासन कुणावरही नियंत्रण ठेवू शकणार नाही,असे न्यायालयाने म्हटले आहे.२० जुलै या दिवशी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपिठासमोर ही सुनावणी झाली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
पती-पत्नीसह दोन मुलांचा रेल्वेखाली मृत्यू; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट अमळनेर, दि. २७ ऑगस्ट २०२६ (गुरुवार) : तालुक्यातील टाकरखेडा येथे...
-
सुरगाणा (नाशिक ) माधव खाबिया :- तालुक्यात रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात आरोग्य विभाग व सुरगाणा पोलिसांनी मोठी धडक मोहीम ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा