Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २६ जुलै, २०२१
उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार,जळगावातील धक्कादायक घटना
जळगाव प्रतिनिधी:उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर आज (25 जुलै) रात्री गोळीबार झाला आहे. हा गोळीबार पूर्ववैमनस्यातून झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे जळगावात प्रचंड खळबळ उडाली आहे. सदर गोळीबार हा त्यांच्या पिंप्राळा येथील घरावर झाला आहे. यात ते सुदैवाने बचावले आहेत. गोळीबाराच्या घटनेनंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.
पोलिसांकडून तपास सुरु
उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर रात्री उशिरा गोळीबार झाला. यात ते सुदैवाने बचावले. गोळीबारानंतर ते तक्रार देण्यासाठी रामानंद नगर पोलीस स्थानकात दाखल झाले. त्यांनी रितसर पोलीस ठाण्यात तक्रार केली.त्यानंतर पोलीस त्यांच्या घरी घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी आले. पोलीस याप्रकरणी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे देखील तपासण्याची शक्यता आहे. गोळीबार करणारे नेमके कोण होते ते अद्याप समजू शकलेले नाही. पण या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांचा या प्रकरणी तपास सुरु आहे.
जळगाव महापालिकेत सत्तांतरात पाटील यांचा मोठा वाटा
कुलभूषण पाटील हे गेल्या काही महिन्यांपासून राजकीय वर्तुळात प्रचंड वेगाने पुढे आले आहेत. जळगाव महापालिकेतील सत्तांतरात त्यांचा मोठा वाटा होता. याचमुळे त्यांना उपमहापौर पद मिळाले. याच पार्श्वभूमीवर आज थेट त्यांच्या पिंप्राळा येथील घरावर गोळीबार करण्यात आल्याचा दावा केला जातोय. या घटनेमुळे शहरामध्ये तणावाचे वातावरण आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा