Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २५ जुलै, २०२१

राष्ट्रीय जनमंच पक्षाचा धुळे जिल्हा मेळावा व पदग्रहण सोहळा संपन्न...!




धुळे शहर प्रतिनिधी -: येथील शासकीय गुलमोहर विश्रामगृह येथे राष्ट्रीय जनमंच पक्ष (सेकुलर) जिल्हा मेळावा व नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती देण्यात आल्या या वेळी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. राधाकृष्ण बाचकर,राष्ट्रीय कार्याध्यक्ष कैलास कोळसे पाटील, प्रदेश अध्यक्ष अविनाश झेंडे, युवक प्रदेशाध्यक्ष सचिन देशमुख,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्नानेश्वर सोनवणे आदि उपस्थित होते. 

यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष बाचकर म्हणाले की संध्या तीन पक्षांचे आघाडी सरकार आहे मात्र 2024 च्या निवडणुकी नंतर पाच किंव्वा सहा पक्षांचे मिळुन सरकार स्थापन होईल व त्यात संत्ताधारी मध्ये राष्ट्रीय जनमंच पक्ष सुद्धा सहभागी असेल असा ठाम विश्वास त्यांनी वेक्त केला ते पुढे असे म्हणाले की आपली विचारधारा ही फुले शाहु आंबेडकर तथा पेरीयार रामास्वामी यांच्या विचारांना अभिप्रेत असल्या कारणाने भविष्या मध्ये या राज्यात जातीयवादी पक्षाला थारा मिळणार नाही म्हणुन कार्यकरत्यानी जोमात कामाला लागून पक्ष बळकट करुन सत्ते मध्ये सहभागी होण्यासाठी तयार रहावे आणी याची सुरुवात धुळे शहरापासुन व्हावी ही अपेक्षा व्यक्त केली,

यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष कैलास कोळसे पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले यावेळी उपस्थितांच्या हत्ते विविध पदाधिकार्याना नियुक्ती पत्र देण्यात आले,कार्यक्रमाचे शुत्रसंचालन जिल्हा अध्यक्ष रितेश चित्ते यांनी केले तर आभार प्रदर्शन जगदिश नेरकर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश तोंडवर,प्रशांत गवळी,परमेश्वर पाटील,केतन चौधरी आदींनी परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध