Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २६ जुलै, २०२१

शिवसेना प्रणित महाराष्ट्र वाहतुक सेना शिरपूर यांच्यावतीने धुळे पळासनेर शिरपूर टोल मॅनेजर यांना निवेदन



शिरपूर प्रतिनिधी:शिवसेना प्रणित महाराष्ट्र वाहतुक सेना शिरपूर यांच्यावतीने धुळे पळासनेर शिरपूर टोल मॅनेजर यांना निवेदन देण्यात आले, निवेदनात सावळदे तसेच गिधाडे गावी तापी नदीवर पूल असून सदर पुलावर संरक्षण जाळी नसल्यामुळे असंख्य निरपराध लोक आत्महत्या करत आहेत तसेच वाहनांना देखील जलसमाधी मिळत असुन त्या ठिकाणी जीवितहानी व वित्तहानी होत असते,सदर पुलामुळे असंख्य आत्महत्याचे प्रमाण वाढत आहे, 
म्हणून त्या पुलावर दोन्ही बाजूंना संरक्षण जाळी बसवून, द्यावी असं निवेदन शिवसेना-महाराष्ट्र वाहतुक सेनेच्या माध्यमातून दिले आहे, 


निवेदनाची दखल घेतली नाहीतर पंधरा दिवसांचा अल्टिमेट सुद्धा या ठिकाणी देण्यात आला आहे, 15 दिवसाच्या आत काम सुरू न झाल्यास शिवसेना स्टाईलने उत्तर देण्यात येईल असे शिवसेना तालुकाप्रमुख दिपक चोरमले यांनी टोल प्रशासनाला दिला यावेळी महाराष्ट्र वाहतुक सेना शहराध्यक्ष जितेंद्र पाटील, उपजिल्हा संघटक विभाभाई जोगराणा.तालुकाप्रमुख दीपक चोरमले. युवासेना तालुका अधिकारी अनिकेत बोरसे, मार्मिकचे पत्रकार सुनील सूर्यवंशी,मलक वाजिद,रेहान सर,पिंटू शिंदे, गणेश बिरारी,विजय पवार,शिवसैनिक उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध