Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ३० ऑगस्ट, २०२१
Home
/
Unlabelled
/
शिरपूरात भाजपा तर्फे शंखनाद आंदोलन राज्यात दारुविक्रीला मुभा मग देवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांकडूनच कोरोनाचा प्रसार होतो का? भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी
शिरपूरात भाजपा तर्फे शंखनाद आंदोलन राज्यात दारुविक्रीला मुभा मग देवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांकडूनच कोरोनाचा प्रसार होतो का? भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी
शिरपूर प्रतिनिधी : महाराष्ट्रात सर्व व्यवहार सुरु होऊन देखील मंदिरे बंद आहेत,म्हणुन मंदिरे उघडण्यासाठी शिरपूरात भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या नेत्तृवाखाली शंखनाद आंदोलन करण्यात आले. टाळ, शंख, घंटा घेऊन सोमवार दि. ३० ऑगष्ट रोजी सकाळी ११:०० वाजता श्रीराम मंदिर देवस्थान, (श्री भोंगे) यशवंत शाळेसमोर शिरपुर येथे आंदोलन करण्यात आले. भाविकांचा आवाज ठाकरे सरकारला ऐकवावा म्हणुन आंदोलनामध्ये भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी,शहराध्यक्ष हेमंत पाटील, धुळे भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, महंत सतिषदास महाराज भोंगे, भागवताचार्य प्रमोद महाराज भोंगे, मा. चिटणीस संजय आसापुरे, भाजपा तालुका चिटणीस सुनिल चौधरी, भाजपा शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, राधेश्याम भोई, भटक्या विमुक्त आघाडी प्रदेश सदस्य रविंद्र भोई, तालुकाध्यक्ष अरविंद्र जाधव, भाजपा आध्यत्मिक समन्वय आघाडी तालुकाध्यक्ष बापु पाटील, छगन गुजर, संतोष माळी, मोहन माळी, पत्रकार मनोज भावसार, बुथ अध्यक्ष राजुलाल मारवाडी, युवा कार्यकर्ते अजिंक्य शिरसाठ, काशिनाथ पाटील, भगवान राजपूत, त्र्यंबक पाटील, सागर जैन, संदीप मराठे, नामदेव पाटील, भरत मराठे, नारायण पाटील, दिपक धनगर, लक्ष्मन गोपाल, विठोबा महाजन, नंदकिशोर जैन, बाळासाहेब पाटील आदि तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्यातील धार्मिक स्थळं खुली करण्यासाठी भाजपने सोमवारी सकाळी शिरपुरात सरकारविरोधी आंदोलनं केले. राज्यात सर्वच व्यापार व्यवहार सुरु असुन दारुविक्रीला मुभा मग देवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांकडूनच फक्त कोरोनाचा प्रसार होतो का? असा सवाल भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी यावेळी केला. ते पुढे म्हणाले की महाविकास सरकारने लवकारात लवकर मंदीरे, चर्च, गुरुव्दारे, मज्जिदी उघडण्यासाठी निर्णय घ्यावा अन्यथा भाजपा तर्फे लवकरच तीव्र आंदोलन करण्यात येईल असा कडक शब्दात इशारा हि दिला.
यावेळी आज काहीही झालं तरी मंदिरात प्रवेश करणार आणि सरकारला मंदिरं खुली करण्यासाठी भाग पाडणार असा रोखठोक पवित्रा भाजपाने घेतला होता. शिरपूर भाजपातर्फे शहरातील मंदिरे उघडण्यासाठी श्रीराम मंदिर देवस्थान, (श्री भोंगे) यशवंत शाळे समोर शिरपुर येथे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या नेत्तृवाखाली महाविकास आघाडी सरकार विरोधात टाळ, घंटा, शंख वाजवत आंदोलन करण्यात आले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा