Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ३० ऑगस्ट, २०२१

बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त..! शिरपूर तालुका पोलिसांची कारवाई..!



शिरपूर प्रतिनिधी : तालुक्यातील सुळे परीसरात बनावट दारूचा मिनी कारखाना तयार होण्यापूर्वीच तालुका पोलिसांकडुन कारवाई करीत उद्ध्वस्त करण्यात आला. या कारवाईत एक लाख 40 हजाराचे 1 हजार 400 लिटर स्पिरीट जप्त करण्यात आले. संशयीत राकेश जैन वाहन व उर्वरित साठ्यासह पसार झाला. याप्रकरणी सांगवी येथील तालुका पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचले का- जळगावात सात वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

गोपनीय माहितीवरून कारवाई
ही कारवाई तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून शनिवार, 28 ऑगस्ट रोजी पहाटे साडे पाच वाजेच्या सुमारास सुळे शिवारातील जुना मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर तालुका पोलिसांच्या पथकाने केली. संशयित राकेश जैन हा पिकअप वाहनातून स्पिरिट भरलेल्या टाक्या खाली उतरवत असताना पथकाने घटनास्थळी दाखल होत कारवाई केली. पोलिसांची चाहूल लागल्याने उर्वरीत तीन टाक्या घेऊन वाहनासह संशयीत पसार झाला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल योगेश मोरे यांनी फिर्याद दिली. राकेश जैन (रा.धुळे) याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नियाज शेख करीत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव,उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने, तालुका पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ, सहा.पोलीस उपनिरीक्षक दिलीप बाविस्कर, हवालदार संजीव जाधव,हवालदार सोनवणे,हवालदार हेमंत पाटील,हवालदार खसावद, संदीप शिंदे,योगेश मोरे,कुवर, चालक संतोष पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध