Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ३१ ऑगस्ट, २०२१
Home
/
Unlabelled
/
बाहुटे ता.पारोळा येथील आशा स्वयंसेविकेला मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची संघटनेची मागणी
बाहुटे ता.पारोळा येथील आशा स्वयंसेविकेला मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची संघटनेची मागणी
पारोळा प्रतिनिधी:दि.२७.०८.२०२१ रोजी बाहुटे ता.पारोळा येथे कोव्हिड-१९ च्या लसीकरण सत्रा दरम्यान कर्तव्यावर असलेल्या आशा स्वयंसेविका श्रीमती सुनिता नाना पाटील यांना गावातीलच भावेश पाटील, कल्पेश पाटील आणि श्रीमती मनीषा पाटील यांनी शिवीगाळ करत मारहाण केली आणि शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला.श्रीमती सुनिता पाटील यांना मारहाण करणाऱ्या वरील समाजकंटकांवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी.
अशी मागणी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज पारोळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री.गणेश भांडारे यांची भेट घेऊन केली.पोलिस निरिक्षक श्री.भांडारे यांनी लागलीच गुन्हा दाखल करण्याचे ठाणे अंमलदार यांना आदेश दिले. हे संघटनेचे यश असून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या एक जुटिचा विजय आहे असे रामकृष्ण पाटील यांनी उपस्थित आशा स्वयंसेविकांना सांगितले.
शिष्टमंडळात अनिता पाटील, मनिषा बडगुजर,सुनिता पाटील,रविशा मोरे,भारती सुर्यवंशी,सुनिता पाटील,नेतल राठोड, कविता राजपूत,मनिषा पाटील,विजया पाटील,रंजना पाटील,भारती पाटील यांच्यासह अन्य आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक उपस्थित होत्या.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा