Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १९ ऑगस्ट, २०२१
Home
/
Unlabelled
/
भाजपात सर्वांनाच योग्यवेळी योग्य संधी मिळत असते..!प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी..!
भाजपात सर्वांनाच योग्यवेळी योग्य संधी मिळत असते..!प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी..!
शिरपूर प्रतिनिधी :भाजपात जातपात नसुन सर्वच समाजाचे जिद्दीचे व चिकाटीचे योग्य कार्यकर्त्यांना योग्य वेळी संधी देवुन मोठे करण्याची संधी भाजपात आहे. असे प्रतिपादन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी केले. भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्षपदी बबनराव चौधरी यांची निवड झाल्याबद्दल येथील पक्ष कार्यालयात शिरपूर शहर व तालुका भाजपा तर्फे आ. काशिराम पावरा, तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील यांचा हस्ते सत्कार करण्यात आला.
त्यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्तें समोर सत्काराला उत्तर देतांना ते बोलत होते. ते पुढे म्हाणाले कि गेल्या चाळीस वर्षापुर्वी मुंबई येथे १९८० मध्ये पक्ष स्थापना दिवशी माजी आ. कै. प्रल्हादराव पाटील यांचा सोबत होतो. तेव्हा पासुन पक्षाचे काम करीत असतांना अनेक चढउतार आलेत मात्र आम्ही कधी हिरमोड झालो नाही सतत पक्षाचे काम जिद्दीने करत राहिलो व अनेक वेळा परिस्थिती वाईट असतांना हि निवडणुका लढाव्या लागल्या व पक्षाचे अस्तित्व टिकविण्याचे प्रयत्न केलेत.
पक्षाने अनेक जबाबदार्या देऊन माझा सन्मान केला असुन आता भाजपा प्रदेश उपाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी दिली असुन हा सन्मान माझा नसुन सर्व कार्यकर्त्यांचा आहे असे त्यांनी शेवटी नमुद केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील,मा.जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, ज्येष्ठ नेते एन.डी.पाटील, शिरपूर मर्चंट बॅन्क चेअरमन प्रसन्न जैन, संजय आसापूरे,नितीन राजपूत,शहर सरचिटणीस महेंद्र पाटील,रोहीत शेटे, तालुका बुथ रचना समन्वयक सुनिल चौधरी,तालुका सरचिटणीस मंगेश भदाणे,जितेंद्र सुर्यवंशी, भटक्या विमुक्त आघाडी प्रदेश सदस्य रविंद्र भोई, रमेश चौधरी, मुकेश पाटील, मुबीन शेख, संजय चौधरी,श्रीकृष्णा शर्मा, राधेश्याम भोई, बापू लोहार, प्रशांत चौधरी, प्रशांत राजपूत, राजुलाल मारवाडी, नंदु माळी,रफीक तेली, भालेराव माळी, विक्की चौधरी,रविंद्र सोनार,जितेंद्र पाटील, सुभाष राजपूत, मनोज भावसार, संतोष भोई, सतीश गुजर, रविंद्र राजपुत, सचिन माळी, जगन पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा