Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १८ ऑगस्ट, २०२१

भोई राज पतसंस्थेचा मोठा मासा लागला गळाला शिदखेड़ा न्यायालयात हजर




ब्रेकिंग शिंदखेडा येथील भोईराज पतसंस्थेत अपहार करणारा मुख्य आरोपी सुनील भोई (वाडीले) याला अटक,शिंदखेडा न्यायालयात हजर केले असता.4 दिवस पोलीस कस्टडी मिळाली आहे.आर्थिक गुन्हे शाखा धुळे याना मोठे यश..

भोईराज पतसंस्थेत अपहार प्रकरणी मुख्य आरोपी सुनील वाडीले यालाअटक
आर्थिक गुन्हे शाखेला यश

शिंदखेडा- शिंदखेडा येथील भोईराज ग्रामीण पतसंस्थेच्या सुमारे 63 लाख रु अपहार प्रकरणी फरार असलेल्या मुख्य आरोपी व्यवस्थापक सुनील पुना वाडीले याला आर्थिक गुन्हे शाखा यांनी सापळा रचून शिंदखेडा येथे अटक केली. दि 18 रोजी शिंदखेडा न्यायालयात हजर केले असता 4 दिवसाची पोलीस कोठडी सूनवण्यात आली आहे.

भोईराज पतसंस्थेत अपहार प्रकरणी शिंदखेडा पोलीस स्टेशन ला संचालक मंडळासोबत व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास आर्थिक गुन्हे शाखा धुळे कडे होता.

मागील 6 महिन्यापासून अपहार करून फरार असलेला भोईराज पतसंस्थेच्या व्यस्थापक सुनील वाडीले हा कानुबाई उत्सवानिम्मित दि.17 रोजी नातेवाईकांना भेटण्यासाठी आला होता.सदर माहिती आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली असता. सायं.7 च्या सुमारास सापळा रचून पाटण चौफुली येथील हॉटेल भूषण जवळून ताब्यात घेण्यात आले.सदर कारवाही पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षण हर्षवर्धन बहिर,पो कॉ मुन्ना शेख,रविंद्र शिंपी यांनी केली.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध