Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १९ ऑगस्ट, २०२१

लिलावाच्या नावाखाली रात्रंदिवस तापी नदी पात्रातून चोरटी वाहतूक सुरूच जप्त केलेली वाळू लिलावापूर्वीच गायब, नसलेल्या वाळूचा खोटा लिलाव



शिंदखेडा  (प्रतिनिधी) मौजे अक्कडसे ता.शिंदखेडा तापी नदी पत्रातून हजारो ब्रास वाळू उत्खनन झालेले असून आजही सुरूच आहे तसेच परिसरातून खाजगी शेत जमिनीतून लाखो ब्रास गाळाचे उत्खनन झालेले होत आहे म्हणून लोकप्रतिनीधी यांनी जिल्हाधिकारी साहेब धुळे यांचे कडे लेखी तक्रार दि.२/६/२०२१ रोजी दिली आहे परंतु तक्रारींची दाखल घेण्यात मुद्दाम हेतूपुरस्कर दिरंगाई करत आहे. कारण महसुली अधिकाऱ्यांना वाचण्याचा प्रयत्न व उद्देश त्या मागचा असावा असे यातून दिसून येते. 

कारण चोरटी वाहतूक होत असल्याचे व्हिडीओ फोटो देऊन ही त्याचे गांभीर्य ने दखल घेतली गेली नाही तेच पुरावे म्हणून अक्कडसे येथून गाळाची चोरटी विना परवानगी बेकायदेशीर वाहतूक करताना पकडण्यात आले तसेच अक्कडसे येथून फॉरेस्ट हद्दीतील जप्त केलेला ४५ ब्रास चोरीचा वाळू साठा गायब होत असतांना शिंदखेडा महसूल खात्याला याची भनक देखील का लागली नाही? तक्रारदार यांनी वेळोवेळी तलाठी अक्कडसे,मंडळ अधिकारी शिंदखेडा यांना भ्रमणध्वनीने होत असलेल्या चोरटी वाहतुकीबाबत वेळोवेळी कल्पना देऊनही अधिकारी येत नाहीत. याउलट उडवाउडवीची कारणे सांगून चालढकल करत असतात. हे सर्व तहसिलदार शिंदखेडा याच्या संगनमताने सुरू आहे. 

असे दिसून येते. कारण तलाठी हे सांगता की आम्ही काय करू? साहेब पकडले की, सोडवण्यास सांगतात त्याचे नाव डायरीत आहे.नाहीतर तुम्हाला दंड भरावा लागेल म्हणून कोणीही मला विचारल्या शिवाय अक्कडसे येथील ट्रॅक्टर पकडता काम नये ? काही दिवसाने जप्त केलेल्या वाळूचा लिलाव करण्यात आला परंतु त्याठिकाणी लिलाव होण्यापूर्वीच वाळू चोरीला गेली याची जाणीव व माहीती असतांना देखील लिलाव करण्यात आला व त्यात महसुल अधिकाऱ्यांनी आपले दलाली करणारे दलालही सामील करण्यात आले व लिलावाबाबत कोणालाही भनक न लागता परस्पर चार भिंतीच्या आड कार्यालयात बसून करण्यात आला. आपल्या मर्जीतील रेती माफियांना हाताशी धरून बंद खोलीत चार भिंती आड गौणखनिज क्लार्क यांनी लिलाव खर्डा आपल्या मर्जी प्रमाणे लिहून आपल्या पदाचा व अधिकाराचा गौरवापर करून लिलावत असलेला मुद्देमाल (रेती) जागेवर शिल्लक नसतांना असा व्हिडिव्ही सोशल मीडियावर व फोटो आहेत व यांची कल्पना ही मंडळं अधिकारी शिंदखेडा यांना तक्रारदार यांनी दिली होती व तलाठी तहसीलदार यांनाही पर्वकल्पना होती. 

तरी देखील रेती माफियांना आर्थिक फायद्यासाठी ४५ ब्रास वाळ दाखवन प्रत्येक्षात झालेल्या चोरट्या वाळू साठा लिलाव होण्यापुर्वी वाळू माफियांनी चोरून लंपास केली. शिंदखेडा महसूल अधिकारी हे असे वागतात की गौण खनिज वाळू ही आमची वडिलोपार्जित मिळकत आहे. चोरटी वाळू लिलाव दाखवून त्या लिलावात कोणीही बोली बोलणारा हजर नसतांना आपल्या मर्जीतील ठेकेदार व अधिकारी यांच्या सह्या घेवून लिलाव करण्यात आला. लिलावात प्रत्येक्षात ४५ ब्रास चोरटी वाळ दाखवण्यात आली व ती लिलाव नंतर वाहतुकी साठी आपल्या मर्जी प्रमाणे १५ दिवस मुदत देऊन असे दर्शविले की, आता मनमर्जी प्रमाणे १५ दिवस आपल्या दलालांच्या मार्फत व रेती माफियांना खुला परवाना देऊन आपल्या अधिकाराचा व पदाचा गैरवापर करून शासनाची महसूल आपल्या खिश्यात कसा जाईल म्हणून अशी अक्कलहुशारीने बेकायदेशीर शासनाची फसवणूक करण्यात आली. 

लिलावाच्या बाबतीत कायदेशीर पूर्व परवानगी न घेता बेकायदेशीरपणे लिलावाची प्रक्रिया करण्यात आली. त्याचा गैर फायदा घेत आजही लिलावाच्या नावाखाली रात्रंदिवस तापी नदी पात्रातून चोरटी वाहतूक सुरूच आहे. आज पावेतो झालेल्या उत्खननाचा पंचनामा करण्यात आलेला नाही यावर असे दिसून येते की शिंदखेडा महसूल खाते किती बेजबाबदार व निगरगट्ट आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध