Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १४ सप्टेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने मा.मुख्य अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग,शिरपूर,यांना आज निवेदन
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने मा.मुख्य अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग,शिरपूर,यांना आज निवेदन
शिरपूर प्रतिनिधी: दिनांक -13/09/2021 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने मा.मुख्य अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग,शिरपूर,यांना आज निवेदन देण्यात आले
शिरपूर शहादा रस्त्यावरील वाघाडी गावाजवळील पुलावरील रस्त्याची स्थिती अतिशय दैनिय झालेली असून आपल्या प्रशासनाची याकडे कोणतेही लक्ष असल्याचे दिसून येत नाही.या पुलाजवळ ब.ना.कुमार गुरुजी हायस्कूल असून शहादा बोराडी व गावातील जनतेच्या वहातूकीचा हा मुख्य एकमेव मार्ग आहे.
त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वरदळ असते.असे असतांना या पुलावरील रस्ता एक अपघाताचा केंद्रबिंदू ठरु शकेल असे मोठ मोठे व खोल खड्डे निर्माण झालेले आहेत.अशी परिस्थिती या रस्त्यांची झालेली असून प्रशासनाचे डोळेझाक व दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.तरी या रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्यात यावे.तरी या रस्त्यांचे काम पुढील १५ दिवसांच्या आत करावे.असे समस्त वाघाडी ग्रामस्थांचे म्हणने आहे.व यास्तव महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आपणास निवेदानाव्दारे सुचित करीत असून रस्त्यांचे काम सुरु न केल्यास मनसे मार्फत जसे रोडवरती खड्डे पडले आहेत असे देखिल तुमचे कार्यालयात खड्डे करण्यात येतील असे मनविसेचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष पुनमचंद मोरे यांनी सांगितले असे आंदोलन छेडन्यात येईल . याची कृपया आपण नोंद घ्यावी ही नम्र विनंती .
यावेळी उपस्थित मनसेचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष राकेश चौधरी मनविसेचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष पुनमचंद मोरे, मनविसेचे शहराध्यक्ष सोनू राजपूत, मनविसेचे तालुका उपाध्यक्ष रमेश अहिरे,मनविसे तालुका उपाध्यक्ष शुभम शिरसाठ,सुनील माळी, ईश्वर मोरे, अजय सोनवणे,तालुका सह सचिव राकेश गुजर,मनविसेचे विखरण गट. प्रशांत तिरमले, आकाश निकुंबे,ज्ञानेश्वर मालचे, व आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
▶ वणी प्रतिनिधी : राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.१) मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुव्दाराचे समोर मंगरुळ फाटा मंगरुळ (ता...
-
अमळनेर | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार अमळनेर शहरात गुरुवारी पहाटे राबविण्यात आलेल्या विशेष कोम...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा