Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १४ सप्टेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांच्या मानधनवाढीचा आदेश पारित, जुलै २०२१ पासून थकबाकी मिळणार.संघटनेच्या आंदोलनाला यश
आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांच्या मानधनवाढीचा आदेश पारित, जुलै २०२१ पासून थकबाकी मिळणार.संघटनेच्या आंदोलनाला यश
राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत सुमारे ६७ हजार आशा स्वयंसेविका आणि ४ हजार गटप्रवर्तक कार्यरत आहेत.आशा स्वयंसेविका गावपातळीवर आरोग्याशी संबंधित सुमारे ७८ प्रकारची कामे करतात. त्यांना प्रत्येक कामाचा वेगवेगळा मोबदला मिळतो तर गटप्रवर्तकांना दरमहा १० हजार रुपये प्रवासभत्ता दिला जातो.
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना दिला जाणाऱ्या मोबदल्यात आणि प्रवासभत्यात वाढ करावी तसेच त्यांना दरमहा ठराविक पगार देऊन शासकीय सेवेत सामावून घ्यावे.यासाठी संघटनेच्या अध्यक्ष मायाताई परमेश्वर यांच्या नेतृत्वाखाली आशा स्वयंसेविकांनी माझे कुटुंब माझे जबाबदारी या मोहिमेच्या काळात बहिष्कार आंदोलन तसेच जुलै महिन्यात काळ्याफिती लावून निषेध आंदोलन केले होते.त्या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री मा. श्री राजेशजी टोपे यांनी मानधन वाढीबाबत मायाताई परमेश्वर यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती.
परिणामी शासनाने आशा स्वयंसेविकांच्या मानधनात जुलै २०२१ पासून १०००/- आणि गटप्रवर्तकांच्या मानधनात १२००/- रुपये तसेच कोरोना महामारी असेपर्यंत प्रत्येकी ५००/- रुपये दरमहा वाढ करण्याचे जुलै महिन्यात जाहीर केले होते.त्यानुसार दि.२६ ऑगस्ट २०२१ रोजी सदर मानधनवाढीला मंत्रीमंडळाने मंंजूरी देऊन सुमारे १३५.६० कोटी रुपयांची वार्षिक तरतूद केली असल्याचा शासकीय आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाचे सहसचिव श्री.वि.ल.लहाने यांच्या सहीने दि.०९ सप्टेंबर रोजी काढला आहे.
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना जुलै २०२१ पासून मानधनवाढीची थकबाकी मिळणार असल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून संघटनेने शासनाचे आभार मानले आहेत.
या मानधनवाढीचा जिल्ह्यातील सुमारे दोन हजार सातशे आशा स्वयंसेविका आणि सुमारे दोनशे पेक्षा जास्त गटप्रवर्तकांना फायदा होणार आहे.आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे.म्हणून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी संघटना अधिकाधिक भक्कम करून लढे आंदोलन तेवत ठेवावेत असे आवाहन संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील( मो.९११२१३२४०३)यांनी केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
▶ वणी प्रतिनिधी : राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.१) मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुव्दाराचे समोर मंगरुळ फाटा मंगरुळ (ता...
-
अमळनेर | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार अमळनेर शहरात गुरुवारी पहाटे राबविण्यात आलेल्या विशेष कोम...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा