Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १५ सप्टेंबर, २०२१

घरगुती गॅस चे दर कमी करा ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती तर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन



घरगुती वापराच्या एल. पी. जी. गॅस सिलेंडर चे जनसामन्यांसाठीचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत.जनसामान्यांची जीवनातील अत्यावश्यक असलेली गरज म्हणजे एल. पी. जी. गॅस सिलेंडर, ज्याचे दर सामान्यांना न परडवणारे व अति प्रमाणात वाढलेले आहेत,अशा प्रकारच्या तक्रारी सतत माणुसकी सोशल फौंडेशन संचलित,ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.दादाभाऊ केदारे तथा स्थानिय समित्यांकडे येत आहेत. 

गॅस दर वाढतच असल्यामुळे जनतेच्या मनात सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात रोष वाढलेला असून, सदरील गॅस सिलेंडर च्या वाढीव  दराचा निषेधार्थ सामान्य, दुर्बल व मध्यम वर्गीय ग्राहक नाईलाजास्तव रस्त्यावर निषेध मोर्चा काढण्याच्या विचारात आहे.गॅस वापरणे परवडत नसल्यामुळे निसर्गाचीही हानी होते, गरीब लोकं नाईलाजास्तव झाडांच्या फांद्या व लाकुड तोडून चूल पेटवतात.धुरामुळे पर्यावरणावर तसेच लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. 
            
ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती धुळे तर्फे जनता – ग्राहकांच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब,जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे यांना निवेदन देण्यात आले. लोकांच्या या भावना राज्य शासन,केंद्र शासन तथा संबधित विभागाकडे पोहचवून, सदरील एल. पी. जी. गॅस सिलेंडरचे मोठ्या प्रमाणात वाढलेले तसेच सामान्य जनतेला न परडवणारे दर तात्काळ कमी करण्यात यावे व जनतेला दिलासा मिळवून द्यावा अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.  

समितीचे जिल्हाध्यक्ष रोहित हरिश्चंद्र शिंगाणे,‌ जिल्हा उपाध्यक्ष संदीप बाळकृष्ण कुळकर्णी, जिल्हा सचिव सौ. मनिषा राजेंद्र चौधरी तथा पदाधिकारी सौ.मंगला बी.पाटील यांनी धुळे जिल्हाधिकारी श्री जलज शर्मा यांची प्रत्यक्ष भेट घेवून सविस्तर चर्चा केली आणि लवकरात लवकर शासनाने यात लक्ष घालावे अशी विनंती करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध