Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १४ सप्टेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, शिरपूर या स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालया तर्फे माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त "प्रवास सायकलचा, जागर आरोग्याचा"
आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, शिरपूर या स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालया तर्फे माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त "प्रवास सायकलचा, जागर आरोग्याचा"
शिरपूर प्रतिनिधी : येथील आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, शिरपूर या स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालया तर्फे माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त "प्रवास सायकलचा, जागर आरोग्याचा" हा सायकल रायडींगचा उपक्रम नुकताच संपन्न झाला.
आ.अमरिशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त दि. १४ सप्टेंबर रोजी भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे संचालक डॉ.जे.बी.पाटील यांनी दिली.
आ.अमरिशभाई पटेल यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिरपूर एज्युकेशन सोसायटी व आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्ट तर्फे संकुलातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या आरोग्य संवर्धनाच्या उद्दिष्टाने संस्थास्तरावर "ऍम्बिशन-2021" क्रीडा स्पर्धा घेण्यात येत आहेत. या अंतर्गत महाविद्यालयाने "प्रवास सायकलचा, जागर आरोग्याचा" या उपक्रमाच्या माध्यमातून सायकल रायडींगचे आयोजन केले होते. यात ५ व १० किलोमीटर अंतर सायकल रायडींगचे लक्ष्य निर्धारित करण्यात आलेले होते. शिरपुरातील वरझडी रोड वरील जलशुध्दिकरण केंद्रापासून सुरु झालेल्या या सायकल प्रवासाचे उद्घाटन संस्था सीईओ डॉ.उमेश शर्मा यांनी हिरवा झेंडा दाखवून केले.
या वेळी स्वायत्त महाविदयालयाचे संचालक डॉ.जे.बी.पाटील, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय सुराणा, इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे उपसंचालक डॉ. प्रमोद देवरे, आय.एम.आर.डी. महाविद्यालयाच्या संचालिका डॉ.वैशाली पाटील, प्राचार्य डॉ.नितीन हासवाणी, महाविद्यालयाचे परीक्षा नियंत्रक
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
▶ वणी प्रतिनिधी : राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.१) मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुव्दाराचे समोर मंगरुळ फाटा मंगरुळ (ता...
-
अमळनेर | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार अमळनेर शहरात गुरुवारी पहाटे राबविण्यात आलेल्या विशेष कोम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा