Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
माजी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एस.व्ही.के.एम. व शिरपूर एज्युकेशन सोसायटीच्या नवीन शैक्षणिक इमारतींचे दि. १८ सप्टेंबर रोजी उद्घाटन
माजी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एस.व्ही.के.एम. व शिरपूर एज्युकेशन सोसायटीच्या नवीन शैक्षणिक इमारतींचे दि. १८ सप्टेंबर रोजी उद्घाटन
शिरपूर प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधान सभेचे विरोधी पक्षनेते ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विले पार्ले केळवाणी मंडळ मुंबई व शिरपूर एज्युकेशन सोसायटीच्या नवीन शैक्षणिक दालनांच्या भव्य इमारतींचे उद्घाटन शनिवारी दि. १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तसेच माजी जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित असली ता. शिरपूर येथील आर. सी. पटेल अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या नूतन शैक्षणिक दालनाचे उद्घाटन सायंकाळी ५.३० वाजता तसेच श्री विले पार्ले केळवाणी मंडळ मुंबई संचलित तांडे ता. शिरपूर येथील मुकेशभाई आर. पटेल सैनिकी शाळेच्या नूतन शैक्षणिक दालनाच्या भव्य इमारतीचे उद्घाटन सायंकाळी ६ वाजता, तांडे ता. शिरपूर येथील मुकेशभाई आर. पटेल निवासी सीबीएसई स्कूलच्या भव्य इमारतीचे उद्घाटन सायंकाळी ६.३० वाजता, श्री विले पार्ले केळवाणी मंडळ मुंबई संचलित तांडे ता. शिरपूर येथील इनडोअर स्टेडियम या भव्य क्रीडा दालनाचा कार्यक्रम सायंकाळी ७ वाजता करण्यात येणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री खा. डॉ. सुभाष भामरे, संसदरत्न खा. डॉ. हिनाताई गावित, माजी शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित, माजी पर्यटन व रोहयो मंत्री आमदार जयकुमार रावल, धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, शिरपूरचे आमदार काशिराम पावरा, शहादा-तळोदा आमदार राजेश पाडवी, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी आमदार शिरीष चौधरी नंदुरबार, धुळे महापौर चंद्रकांत सोनार, धुळे महानगर भाजपा अध्यक्ष अनुप अग्रवाल, धुळे जिल्हा भाजपा अध्यक्ष नारायण पाटील, नंदुरबार जिल्हा भाजपा अध्यक्ष विजय चौधरी, धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव दहिते, शहादा येथील सातपुडा सहकारी साखर कारखाना अध्यक्ष दिपक पाटील उपस्थित राहतील.
मर्यादित स्वरुपात हा कार्यक्रम संपन्न होणार असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सर्व नियमांचे तसेच आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री विले पार्ले केळवाणी मंडळचे जॉइंट प्रेसिडेंट भूपेशभाई पटेल, व्हाईस प्रेसिडेंट चिंतनभाई पटेल व सर्व ट्रस्टी, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण व सर्व संचालक प्रयत्नशील आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
▶ वणी प्रतिनिधी : राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.१) मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुव्दाराचे समोर मंगरुळ फाटा मंगरुळ (ता...
-
अमळनेर | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार अमळनेर शहरात गुरुवारी पहाटे राबविण्यात आलेल्या विशेष कोम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा