Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १८ सप्टेंबर, २०२१

मा.अमरीशभाई अफाट कर्तृत्वाचा लोकनेता..! दिलेला शब्द पाळणारा शालिन नेता...!



   
धुळे जिल्ह्याच्या राजकारणात गेली चार दशके एक नांव सर्वार्थाने सतत गाजते आहे तथा सकारात्मक चर्चेत आहे..ते नांव सन्मानाने घेतलं जावं इतक्या अफाट कर्तृत्वाचा तो नेता आहे..या नेत्याने आपल्या कर्तृत्वाची अशी बिजे रोवलित की त्यांचे नांव विकासाशी आपोआप जोडले गेले..या जिल्ह्यातील एक पाणीदार नेता म्हणून त्यांचा सर्वत्र उल्लेख होऊ लागला.. धुळे-नंदुरबार जिल्हा एकत्र असतांना काँग्रेसच्या सर्वच बड्या नेत्यांना मागे टाकीत त्यांनी जी मजल गाठली याला तोडंच नाही..मतदार संघाच्या विकासाच्या बाबतीत त्यांची उंची आजतागायत कोणत्याही पक्षाचा नेता प्रत्यक्षात गाठू शकलेला नाही..काहींना तुलनेनी त्यांच्यापेक्षा मोठी पदे दीर्घकाळ मिळालीत..पण जिल्ह्याचा नेता होण्याचे भाग्य त्यांना कधीच गवसले नाही..हे प्रखर सत्य आहे ते नाकरण्याचे धाडस आज कोणीही करू शकत नाही..अनेक वर्षे काँग्रेसमध्ये ज्यांच्या नेतृत्वात काम केले अशानांच त्यांनी मागे सारले..जिल्ह्याच्या राजकीय क्षितीजावर आपल्या कामाची अमीट छाप उमटवित कार्यसम्राट होणे तसे सोपे नव्हते..?? काहींना त्यांच्यापेक्षा पदे मोठी मिळालीत पण स्वतःचे नेतृत्व सिध्द करता आले नाही..अनेकदा व्यापक संधी उपलब्ध असून देखील त्या नेत्यांचा दृष्टीकोन मात्र संकुचितच राहिला..स्वपक्षात इतरांना संपविण्याच्या नादात माणूस केंव्हा आपली कब्र खोदतो हे त्यालाच कळत नाही..या जिल्ह्यातील त्याकाळी काँग्रेसचे प्रस्थापित नेते एकमेकांचा काटा काढण्यात जिल्ह्याचा विकास करू शकले नाहीत ही वास्तवता आहे..ज्या नेत्याकडे शालिनता व सभ्यता तथा विकासाचे व्हीजन असते व जो नेता आपल्या सोबतच्या कार्यकर्त्यांची कदर करतो व इतरांनाही राजकारणात मोठं करतो अशा नेत्याच्या सामर्थ्याला सर्वत्र सलाम केला जातो..विकासाचा आराखडा केवळ कागदावर न ठेवता त्याला जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी व जनताजनार्दनाच्या अपेक्षा पूर्णत्वास नेण्यासाठी जो नेता आयुष्यभर झटतो आहे त्या महान नेत्याचे नांव आहे..विकास पुरुष मा.आमदार अमरीशभाई पटेल..शिरपूरच्या सर्वांगीण विकासाचे सुंदर शिल्प साकारण्यासाठी त्यांनी संपूर्ण हयात खर्च केली..प्रचंड विश्वासार्हता असलेला व दिलेला शब्द पाळणारा या जिल्ह्यातील एकमेव नेता कोणी असेल तर ते केवळ अमरीशभाई पटेल आहेत..राजकारणात धुरंदर असलेल्या या नेत्याला लांडीलबाडी करणे व विश्वासघात करणे कधीच जमले नाही..राजकारणात भाईंनी दिलेला 'शब्द म्हणजे रामबाण'तथा मुखातून निघालेला 'शब्द म्हणजे प्रमाण' हाच त्यांच्या राजकीय व सामाजीक क्षेत्रातील रिवाज बनला आहे..एकदा दिलेला शब्द नाकारण्याचा दळभद्रीपणा त्यांच्या मुळी रक्तातच नाही.. त्यांचे वडील स्वर्गीय रसीकलाल पटेल उर्फ पापाजी हे देखील शब्दाचे धनी होते.. आदरणीय अमरीशभाईंना तो संस्कार आपल्या पित्याकडून लाभलेला आहे.. जीवनात कोणालाही शब्द देण्यापूर्वी तो पाळलाच गेला पाहिजे..?? पित्याकडून अंगीकारलेला हाच 'जीवनमंत्र' भाईंच्या यशस्वी होण्याचे खरे तंत्र मानले जाते... 
रघुकुल रित सदा चली आयी,
प्राण जाये पर वचन न् जायी.! 

(धुळे जिल्ह्याचे विभाजन झाले..)
   
जिल्हा विभाजनापूर्वी माजी मंत्री मा.स्वरूपसिंग नाईक व मा.रोहिदास दाजी पाटील या दोन्ही नेत्यांच्या भवती राजकारण केंद्रीत होते..या जिल्ह्यात काँग्रेस शिवाय दुसऱ्या पक्षाला फारसा वाव नव्हता.. त्यातही मा.स्वरूपसिंग नाईक यांचे पारडे जड होते..धुळे नंदुरबार या संयुक्त जिल्ह्यात लोकसभा,विधानसभा,जिल्हा परिषद व पंचायती निवडणुकी मध्ये सर्वत्रच काँग्रेसचा बोलबाला होता..इतर पक्षांचे फारसे अस्तित्वच नव्हते..सर्वत्र काँग्रेसची दादागिरी व सरंजामशाही फोफावलेली होती... उभयतांकडे रग्गड पैसा असल्याने पैशाचा उन्माद स्वस्थ बसू देत नव्हता..एकाच पक्षातील दोन्ही राजकीय नेत्यांचा एकमेकांवर कुरघोडी करण्यातच शक्ती आणि वेळ अधिक खर्ची पडत होता.. त्यामुळे विकासाचा अनुशेष या काळात कधीच भरून निघाला नाही..दोन्ही नेत्यांचे वरती दिल्ली पर्यंत पक्षश्रेष्ठींकडे भरपूर वजन असल्याने..दोघांना मंत्री पदाची समान संधी सतत मिळत गेली..पण त्या तुलनेत जिल्ह्याच्या विकासाचे स्वप्न मात्र आकारास येऊ शकले नाही हे दुर्दैव आहे..यातून जनतेचा भ्रमनिराश होत गेला..जनतेचा राजकीय नेत्यावरील विश्वास उडत गेला... कोणताही विकासाचा प्रकल्प त्याकाळात जिल्ह्यात उभा राहिला नाही..अखेर नैराश्यातून जिल्हा विभाजनाचे वारे वाहू लागले..त्याचाच परिणाम हेतू १९९६-९७ मध्ये धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन त्यातून स्वतंत्र नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली.. त्यादिवशी या बड्या नेत्यांचा खुजेपणा सिद्ध झाला..दोन स्वतंत्र टिल्लू-पिल्लू जिल्हे नव्याने अस्तित्वात आले..महाराष्ट्राच्या नकाशावर लळींगच्या ऐतिहासिक किल्ल्यापासून तर सातपुड्याच्या जंगल व दय्राखोय्रापर्यंत पसरलेल्या या जिल्ह्याच्या निसर्गदत्त सौंदर्याला जणू नख लावले गेले.. नेत्यांच्या शारिरीक व राजकीय उंची इतकेच ते नवनिर्मित जिल्हेही जन्मजात खुजे ठरलेले आहेत..तो पर्यंत इकडे मात्र मा.अमरीशभाई यांच्या कामाचा दबदबा वाढतच चालला होता..गतीने प्रगती करण्याचं तंत्र अवगत असलेल्या मा.अमरीशभाईंच्या समोर जिल्ह्याचा नेता होण्याची नवीन संधी चालून आली होती.. आणि त्या संधीचं त्यांनी देखील सोनं केलं.. राजकारणातील विश्वासार्हता व प्रामाणिकपणा आणि दिलेला शब्द पाळणे या त्रिसुत्रीच्या बळावरच मा.अमरीशभाईंना लोकनेता बनता आले..त्यांनी शिरपूर नगरीचा कायाकल्प केला..आज या जिल्ह्यातच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रात शिरपूर पॅटर्नची चर्चा होत असते..त्यांनी निर्माण केलेलं साम्राज्य दैदीप्यमान आहे.. आज जिल्ह्यात शिरपूरच्या तुलनेत कोणतेही शहर इतर नेत्यांना विकसीत करता आलेले नाही ही शोकांतिका आहे.. पाच-पाच टर्म आमदार व कित्येकदा खासदार म्हणून निवडून आलेल्या तथा मंत्री पदाची झुल पांघरलेल्या नेत्यांनी अखेर या जिल्ह्यातील जनतेला काय दिले..?? हा सवाल खय्रा अर्थाने सतत अनुत्तरित राहणारा आहे..आज अमरीशभाईंनी बाळगलेला विकासाचा दृष्टीकोन हेच मेरीट त्यांना शिरपूर नगरीचे भाग्यविधाते तथा जिल्हानेता बनण्यास उपयुक्त ठरलेले आहे..केंद्रीय मंत्री मा.ना.नितीन गडकरी यांनी संसदेत दोनदा मा.आ.अमरीशभाई पटेल यांच्या 'पाणी आडवा पाणी जिरवा' या शिरपूर पॅटर्नचा उल्लेख करून मा.आ.अमरीशभाईंच्या कर्तृत्वाचा गौरव केला होता..शेतीच्या पाण्याचा प्रश्न तथा जमीनीत पाणी जिरविण्याच्या दृष्टीने त्यांनी राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे आज शिरपूर तालुक्यातील शेतकय्रांचे जीवनमान उंचावणारा ठरला आहे..संपूर्ण तालुका सुजलाम सुफलाम होतांना दिसतो आहे.. शिरपूर शहरातील नव्याने उभारलेल्या सरकारी इमारती,प्रशस्त काँक्रीट रस्त्यांची साकार झालेली कामे,तलाव,उद्याने,वाॅटर पार्क,शाॅपींग काॅम्प्लेक्स, मार्केट्स, शाळा-काॅलेजेस,पिण्याचे चोवीस तास शुध्द पाणी, साधन संपत्ती तसेच शिरपूरच्या सौंदर्यात भर घालणारे तापी नदीच्या किनाय्रावरील विशाल व तितकंच देखणं 'निम्स काॅलेज' असे विविध प्रकल्प व विकासाची कामे ही कोणतीही छुपी टक्केवारी अथवा कमीशन न खाता झालेली आहेत..म्हणूनच ती सर्वच कामे पर्यायाने दर्जेदार व टिकाऊ आहेत.. अमरीशभाईंच्या राजकीय इराद्या इतकीच ती मजबूत व दमदार देखील आहेत..यात तिळमात्र शंका नाही..

(भाईनी शेकडो कार्यकर्त्यांना मोठे केले)

राजकारणात मा.अमरीशभाईंनी असंख्य माणसे मोठी केलीत..अनेक कार्यर्कत्यांना नेते केलं..त्यांनी ठरवलं असतं तर आरक्षण वगळता शिरपूर शहराचे नगराध्यक्ष पद तहहयात स्वतःच्या कुटुंबासाठीच राखीव ठेवले असते..कोणीही विरोध केला नसता अथवा करणारेही नव्हते..अनेकदा स्वकर्तृत्वाने उभे राहिलेलं राजकीय साम्राज्य माणसाला अहंकारी व आत्मकेंद्रीत बनवत असतं..आपल्या यशामध्ये अनेकांचा सहभाग व सदिच्छा असतात याचाच त्याला विसर पडत जातो.. त्यात अनेकांचा सिंहाचा व खारीचा वाटा आहे हेच तो नेमकं विसरत जातो..पंरतु असला आत्मघातकी विचार मा.अमरीशभाईंच्या विशाल मनाला कधीच शिवला नाही..मित्रांनो एक गोष्ट आयुष्यभर नक्की व पक्की स्मरणात ठेवली पाहिजे.. मोठी माणसं ही सदासर्वदा मोठीच असतात व ती जन्मजात थोर असतात..कितीही अपदा व संकटे येऊदेत ते आपला चांगुलपणा कधीच गहाळ होऊ देत नाहीत.. त्यांचे मोठेपण हे पद व पैशात नव्हे तर माणूसकीच्या व नैतिकतेच्या तराजूत तोलले जाते..अन्यथा काही भंपक,चंपक, हलकट, कुचकट, उपटसुंभ,कोरडे जलकुंभ, संकुचित मनाचे नेते राजकारणात नशीबाने येतात पण कधी कालबाह्य होतात याची साधी दखलही कोणी घेत नाही..त्यांचे कोणीही अनुयायी नसतात..कारण त्यांनी संपूर्ण हयातीत कोणालाही मोठे केलेले नसते अथवा प्रेमही दिलेले नसते..आपल्या सोबतच्या कार्यकर्त्यांचा सुड उगवण्या खेरीज त्यांचे वेगळे कर्तृत्व ते कधीच पणाला लावीत नाही..अशांना काळही विसरत जातो..परंतु अमरीशभाईंनी सुडाचे व जातीपातीचे राजकारण कधीही केले नाही..तसले पाप त्यांच्या कृतीतून कधी घडले नाही..त्यांनी अनेक नवीन कार्यकर्त्यांना व गरीबांच्या पोरांना राजकारणात संधी दिली व मोठे केले.. राजकारणात मा.भुपेशभाई हे देखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत सावली सारखे निरंतर सोबत चालत राहिले..मैत्रीच्या लायक असलेले अत्यंत विनम्र स्वभावाचे भाईंचे लहान बंधू मा.भुपेशभाई यांनी आपली भुमिका भाईंच्या राजकारणात महत्वाची वठवलेली आहे..प्रभु रामचंद्राच्या अपरोक्ष भरता प्रमाणे राज्य सांभाळणारे मा.भुपेशभाई हे देखील एक विलक्षण व्यक्तीमत्व व त्यागाचे प्रतिक आहेत..अन्यथा दोन भाऊ पन्नास वर्षे राजकारणात प्रामाणिकपणे एकत्र नांदणे आजकाल दुर्मिळ उदाहरण आहे.. तसेच शिरपूरच्या राजकारणात ज्यांचे सन्मानाने व आपुलकीने नांव घेतले जाते तसेच भाईंचे अत्यंत विश्वासू, निष्ठावंत, समर्पित तथा प्रामाणिक सहकारी मा.प्रभाकर चव्हाण रावसाहेब व श्री.राजगोपाल भंडारी यांनी देखील पन्नास वर्षात आपला नेता बदलला नाही..हे देखील काय कमालीचे उदाहरण आहे..? राजकारणात पन्नास वर्षे कार्यकर्ते संपूर्ण विश्वासाने व तितक्याच निष्ठेने एकाच नेत्यासोबत काम करतात..?? त्या नेत्याची अशी काय जादू असेल..? सात वेळा नगरसेवक झालेले मा.प्रभाकर चव्हाण हे शिरपूरचे नगराध्यक्ष झाले..श्री.प्रभाकर रावसाहेब व श्री.राजगोपाल भंडारी ही दोन माणसे भाईंच्या अत्यंत निकटवर्तीय.. भाईंनी या दोघांना भरभरून प्रेम व पदे दिलीत..या दोघांची देखील मा.अमरीशभाईंवर नितांत श्रद्धा व अतूट विश्वास आहे..या दोघांच्या खांद्यावर शिरपूर एज्युकेशन संस्थेच्या ऐंशी शाखांचे अत्यंत महत्त्वाचे दायीत्व सोपविले आहे..एक उपाध्यक्ष व दुसरे सचीव आहेत... प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या या मांदियाळीत आणखी एक नांव श्री.श्यामकांत ईशी यांच संपूर्ण अदबीने घेतलं पाहिजे..?? श्यामकांत ईशी हे भाईंच्या नजीकचे प्रेमळ व गोड कार्यकर्ते आहेत..मा.अमरीशभाईंनी तालुक्यातील इतरही कार्यकर्त्यांना विविध राजकीय संस्थांच्या पदांवर नेतृत्वाची संधी बहाल केली..त्यात प्रामुख्याने मा.तुषारभाऊ रंधे, श्रीमती कलाबाई भील व सौ.सरलाबाई पाटील यांना जि.प.अध्यक्ष पदाची तर श्री.के.डी.पाटील, श्री.काशिनाथ राउळ, श्री.देवेंद्र पाटील यांना उपाध्यक्ष पदाची संधी दिली..श्री.मनोहर रामचंद्र पाटील यांना भूविकास बँकेचा चेअरमन व श्री लक्ष्मण बाजीराव पाटील, स्व.मंजूर शेख इब्राहिम यांना सभापती केले..शेकडो कार्यकर्त्यांना पदे व जबाबदाय्रा वाटणाय्रा मा.अमरीशभाईंनी जातीपातीचे गलिच्छ व बोगस राजकारण कधीच केले नाही..जेवढी माणसे मोठी केली ती सामान्य घरातील होती..भाईंनी एकदा जो शब्द दिला अथवा जो निर्णय घेतला तो अंतीम असतो..प्रसंगी ते करण्यासाठी कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल पण मागे हटणार नाही..हे एक वैशिष्ट्य त्यांनी आयुष्यभर जोपासले आहे. 

(एकमुखी निर्णय घेणारा खरा जननायक !!)

शिरपूरला आपली पुण्यभुमी व कर्मभुमी मानणारे मा.अमरीशभाई साडेबारा वर्षे नगराध्यक्ष १९९०, १९९५, १९९९, २००४ असे सलग चार वेळा विधानसभेवर आमदार तसेच मतदार संघ एस.टी.राखीव झाल्याने २००९ व २०१५ दोन वेळा विधान परिषदेचे आमदार झाले..आणि राखीव मतदार संघातून देखील भाईंनी मा.आ.काशीराम पावरा यांना सतत तिसय्रांदा आमदार केले..अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाय्रा जिल्हा परिषद व जिल्हा मध्यवर्ती बँकेत गेली वीस पंचवीस वर्षापासून मा.अमरीशभाई सांगतील तीच व्यक्ती अध्यक्ष होऊ शकते..ही त्यांची 'दादागिरी' कोणालाही मोडून काढता आली नाही..यंदा तर त्यांनी भाजपात प्रवेश केल्यावर मी सांगेन तोच जिल्हा परिषद अध्यक्ष होईल..!! हे मा.तुषारभाऊ रंधे यांना राजतिलक लावून आपली 'दादागिरी' पुन्हा एकदा सिद्ध केलेली आहे..याला गमतीने "भाईगिरी अथवा दादागिरी" म्हणा..?? परंतु राजकारणात असले निर्णायक फैसले अफाट कर्तृत्व असलेला नेताच घेऊ शकतो..मा.अमरीशभाईंचे पन्नास वर्षाचे राजकीय करियर त्यामध्ये तपश्चर्या,साधना, प्रामाणिकता,विश्वासार्हता,पारदर्शकता, सामाजिक संवेदना व बांधिलकी तथा विकासाचा ध्यास आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे दिलेला शब्द पाळणे..!! अशा सद्गुणांची साथ असावी लागते..तरंच असली भाईगिरी धकू शकते..अन्यथा आज प्रगल्भ लोकशाही व अभिव्यक्ती स्वातंत्र्य इतकं पुढे गेलंय की शाळेत वर्गातला माॅनिटर देखील एकमुखी निर्णयातून नेमला जात नाही.. मात्र राजकारणात एकमुखी निर्णय घेण्यासाठी तथा सर्वार्थाने नेतृत्व सक्षम होण्यासाठी अंतःकरण शुध्द व मन उदार असलं पाहिजे..अन्यथा राजकारणात नशिबाने आमदार, खासदार, मंत्री कोणीही होऊ शकतं..?? अलीकडे पुढारी कोणालाही होणे तेवढे सोपे झाले आहे.. त्यांचा गल्लोगल्ली ऊत आलेला आहे.. परंतु जननायक अथवा लोकनेता होणे खुपच दुरापास्त आहे..ती एक कठोर परिक्षा असते..त्यासाठी विचारात शालीनताता, जगण्यात प्रामाणिकता, प्रचंड क्षमता व आर्थिक उदारता असे चतुरस्त्र व्यक्तीत्व असावे लागते तोच लोकनेता होऊ शकतो.. मा.अमरीशभाईंकडे हे गुण ओतप्रोत भरले आहे..स्वतःच्या स्वार्थासाठी खोटे बोलणे, छलकपट,धोकाधडी, छक्केपंजे व विश्वासघाताचे राजकारण असला हलकटपणा भाईंनी आयुष्यात कधीच केलेला नाही..चुकणाय्राला क्षमा करण्याची व विरोधकांना देखील खिंडीत न पकडता त्यांना सहकार्य करण्याची भावना या दोन गोष्टी भाईंना या जिल्ह्याचा नेता बनण्यास उपयुक्त ठरल्या आहेत..समोर कोणीही असूदेत तोंडावर बोलणे, सडेतोड वागणे हा मा.अमरीशभाईंच्या स्वभावातील दोष आहे की गुण हे आता जनतेला व त्यांच्या विरोधकांनाही संपूर्ण अवगत झालेलं आहे... 

(SVKM च्या माध्यमातून देशभर प्रस्थान !)

आज संपूर्ण देशात नावाजलेली मुंबईतील 'एसव्हीकेएम शैक्षणिक संस्था' यावर मा.अमरीशभाई गेल्या वीस वर्षापासून चेअरमन आहेत..अनेक सेलिब्रेटिज व लब्ध प्रतिष्ठित त्या संस्थेत आपल्या मुलांना प्रवेश मिळविण्यासाठी रांगेत उभे असतात..आज त्या शैक्षणिक संकुलाच्या देशभर विस्तार होतो आहे..त्या संस्थेच्या अनेक शाखा निर्माण करण्याचं विशाल कार्य भाईंच्या नेतृत्वात होते आहे..हैदराबाद, बेंगलोर, चंदीगड,इंदौर,नवीमुंबई,धुळे,शिरपूर अशा विविध शहरांमध्ये SVKM च्या भव्यदिव्य व देखणी शैक्षणिक संकुले उभी राहिलेली आहेत..त्या संस्थेच्या स्वच्छ व पारदर्शी कारभारामुळे भाईंच्या नेतृत्वाला प्रचंड प्रतिसाद प्राप्त झाला आहे..अमरीशभाईंच कर्तृत्व हे कढीखाऊपणा व कंजूसीत कधीच अडकलं नाही..गरीबांच्यासाठी असलेल्या योजनेतून कमीशन चोरणे अथवा पैसा कमविणे असले पाप करणे या श्रीमंत मनाच्या नेत्याला कधीच आवडले नाही.. अन्यथा अनेक संस्थाचालक गोरगरीब मुलांच्या खीचडीचे तांदूळ बाजारात विकून आपली पोटं व घरदारं भरतात..गरीबांची सुगडी चोरून बासमती राईस खाणाय्रा धच्चोट व लफंग्या संस्थाचालकांनी मा.अमरीशभाईंचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे..आज एसव्हीकेएम संस्थेच्या माध्यमातून शिरपूरला साडेतीनशे बेडचे अद्ययावत हाॅस्पीटलचे काम वेगाने सुरू आहे..कामाचा प्रचंड आवाका व व्यापक दृष्टीकोन असलेल्या मा.अमरीशभाईंचे आणखी एक वैशिष्ट्य आहे, कार्यकर्त्यांशी ते दिलखुलास चर्चा करतात..काही नावीन्यपूर्ण उपक्रम अथवा कल्पना असल्यास ऐकूनही घेतात.. त्यांच्याशी विचारविनिमय करून निर्णयही घेतात..त्यांचा निर्णय एकमुखी असला तरीही एवढी लोकशाही ते आवर्जून पाळतात..ते कार्यकर्त्यांना सन्मानाने वागवतात..आपल्याकडे आलेल्या अभिभावकांची आस्थेने वचारपूस करतात..बाहेरून आलेल्या लोकांना चहापान, नाष्टा व जेवणाची सोय केली जाते..अन्यथा अलीकडे आपल्या प्रकटदिनाचा जल्लोष जोरात मनवणारे तथाकथित नेते आहेत..कार्यकर्त्यांनी आणलेले बुके व हार आणि उपहार किती किंमती आहेत हेच न्याहाळत असतात.. त्यासाठीच स्पेशल व्हीडीओ चित्रण केलं जातं..आपले बॅनर कोणीकोणी लावले अथवा लावले नाहीत याची सखोल चर्चा करतात..परंतु कार्यकर्त्यांना साधं चहापाण्याची देखील विचारपूस होत नाही.. अशा दळभद्री व माणूसपण हरवलेल्या नेत्यांनी भाईंच्या राजकीय कार्यक्रमात अथवा बैठकी नंतर कसल्या क्वालिटीचे जेवण दिले जाते हे एकदा जाऊन बघीतले पाहिजे..मा.अमरीशभाई आता नव्यानेच भाजपात आलेत..यंदाच आम्ही भाजपाच्या लोकांनी जिल्हा परिषद अध्यक्ष व सभापती निवडीच्या निमित्ताने झालेल्या तीनचार बैठकीच्या वेळी ते अनुभवले आहे..खरं म्हणजे कार्यकर्ते काही नेत्यांच्या अन्नावर जगत नाहीत..परंतु शिष्टाचार असायला हवेत..पण त्यासाठी देखील शेवटी दानत श्रेष्ठच असावी लागते..मा.अमरीशभाई आपण ज्यादिवशी तत्कालीन मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्या समक्ष भाजपात प्रवेश केला त्यादिवशी भाजपात माझ्यासकट मनःपूर्वक अनेकांनी आपलं स्वागत केलं..आमच्या पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांचा उत्साह तुमच्या आल्याने वधारला आहे..आता हा पक्ष तुमचाही आहे आणि तुम्ही देखील आमचे सर्वांचे नेते आहात..आदरणीय अमरीशभाई शेवट करतांना एकच गोष्ट अधोरेखित करतो.. आपण काँग्रेसमध्ये होतात तेंव्हाही जिल्हानेते होतात..आणि आज भाजपात आल्यावरही आपण जिल्हानेतेच आहात..हे सत्य कोणालाही नाकारता येणारे नाही.. राजकारणात एक गोष्ट वर्षानुवर्षे बोलली जाते..काही नेते पक्षामुळे मोठे होतात अन् काही पक्ष नेत्यांमुळे मोठे होतात..आपण यापैकी कोणत्या वर्गात बसतात हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही..आपले कर्तृत्व अफाट आहे..आपला दृष्टीकोन व्यापक आहे..आपलं मन मोठं आहे..अन् अशाच नेत्यासाठी 'जिल्हानेते पद' सद्या आरक्षित आहे..मला व्यक्तीपुजा मान्य नाही..व्यक्त्ती केंद्रीत राजकारण मला मान्य नाही..परंतु काही व्यक्ती या आपल्या अफाट कर्तृत्वाने सदासर्वदा महान व पुज्यनीय असतात..अन् तेच त्यात्या पातळीवर पक्षाचा चेहरा बनतात..श्रध्देय अटलजी व मा.अडवाणीजी त्याकाळी पक्षाचा चेहरा बनलेत..आज पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी आहेत..एकेकाळी स्वर्गीय इंदिराजी व स्व.राजीवजी काँग्रेसचा चेहरा होते..आज काँग्रेसकडे चेहराच नाही.. म्हणूनच पक्षाची वाताहात झालेली आहे.. धन्यवाद..!! 
शेवटी माझ्यातला शायर हेच म्हणतो आहे..

किसी चिराग़ का अपना मकाँ नही होता,
वो जहाँ भी जाता है रोशनी लूटाता है..!! 

संजय शर्मा,धुळे भाजपा प्रदेश प्रवक्ता...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध