Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
शहरातील करवंद रस्त्यावर पेट्रोल पंपसमोर टी.एम.सी शेडच्या बाजूला मंगळवारी अज्ञात व्यक्तिचा मृतदेह आढळून आला
शहरातील करवंद रस्त्यावर पेट्रोल पंपसमोर टी.एम.सी शेडच्या बाजूला मंगळवारी अज्ञात व्यक्तिचा मृतदेह आढळून आला
शिरपूर प्रतिनिधी:-शहरातील करवंद रस्त्यावर पेट्रोल पंपसमोर टी.एम.सी शेडच्या बाजूला मंगळवारी अज्ञात व्यक्तिचा मृतदेह आढळून आला असून सदर व्यक्तीची उशिरा पर्यंत माहिती मिळून आली नाही. याप्रकरणी उपजिल्हा रुग्णालयातील वार्डबॉय खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील करवंद रस्त्यावर पेट्रोल पंपसमोर टी.एम.सी शेडच्या बाजूला आवारात अंदाजे 40 वर्षीय अनोळखी व्यक्ती मयतावस्थेत असल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे ,विकास सेन,श्रीरामचंद्र येशी यांनी शिरपुर शहर पोलिसांना ही दिली.दरम्यान शहर पोलिस ठाण्याचे पोना कुंदन पवार व इतर कर्मचारी दाखल होत पाहणी केली तसेच पंचनामा केला.सदर अनोळखी मयतावस्थेत शहरातील उपजिल्हा रुग्णालयात अम्ब्युलन्सने दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.
याप्रकरणी वार्डबॉय च्या खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.सदर अनोळखी व्यक्तीच्या मृतदेहाची अद्याप ओळख झाली नसल्याचे पोलिसांकडून माहिती देण्यात आली आहे.पुढील कार्यवाही शहर पोलिसांकडून सुरु आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
▶ वणी प्रतिनिधी : राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.१) मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुव्दाराचे समोर मंगरुळ फाटा मंगरुळ (ता...
-
अमळनेर | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार अमळनेर शहरात गुरुवारी पहाटे राबविण्यात आलेल्या विशेष कोम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा