Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१
व्यंकटेश नगरसाठी अंगणवाडी द्या सुरज बोरसे यांची मागणी..!
शेगाव : शहर प्रतिनीधी (उमेश राजगुरे )शहरातील व्यंकटेश नगर साठी गेल्या अनेक वर्षापासून अंगणवाडी नसल्यामुळे या परिसरातील बालके शालेय पोषण आहारापासून वंचित राहत आहेत तसेच अंगणवाडी नसल्यामुळे शिक्षणाची ओढ बालकांना लहानपणापासून लागत नाही त्यामुळे व्यंकटेश नगर साठी अंगणवाडी देण्यात यावी अशी मागणी सुरज बोरसे यांनी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी बुलढाणा यांच्याकडे २२ सप्टेंबर रोजी केली आहे.
बऱ्याच ठिकाणी कुपोषणाच्या प्रमाणात वाढ झाली असली तरी हे प्रमाण शहरी भागात कमी आहे परंतु कुपोषण पूर्णतः रोखण्यासाठी प्रत्येक बालक अंगणवाडीत गेले पाहिजे परंतु बऱ्याच ठिकाणी आजही अंगणवाडीचा अभाव दिसून येते क्षमतेपेक्षा जास्त बालके झाल्याने इतर अंगणवाडीत त्यांचा प्रवेश निश्चित करण्यात येत नाही. व्यंकटेश नगर भागातील अनेक बालके गेल्या काही वर्षापासून अंगणवाडीच्या प्रवेशापासून वंचित आहेत त्यामुळे व्यंकटेश नगरात अंगणवाडी देण्यात यावी अशी मागणी सुरज बोरसे यांनी केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
▶ वणी प्रतिनिधी : राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.१) मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुव्दाराचे समोर मंगरुळ फाटा मंगरुळ (ता...
-
अमळनेर | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार अमळनेर शहरात गुरुवारी पहाटे राबविण्यात आलेल्या विशेष कोम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा