Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १३ सप्टेंबर, २०२१

शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या वार्ड नं.१३ वरवाडे भागात डेंग्यु आजाराविषयी जनजाग्रुर्ती




शिरपूर प्रतिनिधी: माजी मंत्री,विद्यमान आमदार मा.अमरीशभाई पटेल,शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ.जयश्रीबेन पटेल शि.व.न.पा.
उपनगराध्यक्ष मा.भुपेशभाई पटेल,नगर अभियंता मा.माधवराव पाटील,प्रशासकीय अधिकारी संजय हासवाणी आरोग्य विभाग प्रमुख जितेंद्र अहिरे,शि.व.न.पा.नगरसेविका सौ.चंद्रकला संतोष माळी शि.व.न.पा.
नगरसेवक दिपक महादु माळी या सर्वांच्या मार्गदर्शनाने सर्व नागरिकांनी डेंग्यू आजारावर मात करण्यासाठी घरोघरी काळजी घ्यावी यासाठी वार्ड नं.१३ वरवाडे म्हाळसामाता परिसर,महात्मा फुले पुतळा परिसर नवे गाव,जुने गाव,सावित्रीबाई फुले नगर,दुधदेअरी काॅलनी,फुले नगर या सर्व भागात शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे कर्मचारी भगवान माळी,भुपेश पाटील व आशा वर्कर वैशाली बुवा,रुपाली बुवा  भाजपा आध्यात्मिक शहराध्यक्ष संतोष महारु माळी यांनी प्रत्येकांच्या घरोघरी जाऊन डेग्युं आजाराविषयी घ्यावयाची काळजी,डेग्युं आजारावर मात करण्यासाठी नागरींकाना,महिलांना समजुन लोकांना सावध करत आहेत डेंग्यु आजार फार त्रासदायक आहे. 

म्हणुन शक्यतो ओडोमाॅस हातापायांना लावा नाहीतर लिंबाच्या पाला हातापायांना लावा,फ्रीज,टेरेसवरील टायरमधील पाणी,अंगणातील पाण्याची टाकी स्वत: चेक करुन स्वच्छ करा नागरीकांना सावध करत आहेत या कार्यात माजी उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे, सा.कार्यकर्ता भालेराव माळी,संत सावता माळी समाज मंदिर वरवाडे ट्रस्ट सचिव अधिकार माळी ,जय म्हाळसादेवी मंदिर संचालक वरवाडे वसंत माळी यांचे सहकार्य लाभले त्यात महादु माळी,पुंडलीक माळी,जम्मु नाना,रोहिदास माळी,अविनाश पाटील आदि उपस्थित होते तसेच डेंग्यु आजाराविषयी जनजाग्रुर्तीसाठी वरवाडे गावातील नागरिकांचे व विशेष महिलांचे सहकार्य लाभत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध