Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
शिरपूर तालुक्यात वनजमिनीवरील गांजा शेती उद्धवस्त, शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना मिळालेल्या गोपनीय माहिती वरून धडक कारवाई
शिरपूर तालुक्यात वनजमिनीवरील गांजा शेती उद्धवस्त, शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना मिळालेल्या गोपनीय माहिती वरून धडक कारवाई
शिरपूर प्रतिनिधि - तालुक्यातील मुखेड शिवारात नवापाडा परिसरात कुंबीपाडा रस्त्यावर एका वनजमिनीवर गांजा लागवड केलेले गांजा शेत शहर पोलिसांनी एका गोपनीय माहीती वरून बुधवारी सकाळ च्या सुमारास उद्धवस्त करून लाखोंचा मुद्देमाल जप्त करीत संशयितांस ताब्यात घेत कारवाई केली.
शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना मिळालेल्या गोपनीय माहिती वरून बुधवारी सकाळी करण्यात आली.संशयितास पोलिसांनी राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे.
शिरपुर तालुक्यातील मुखेड शिवारात नवापाडा परिसरात कुंबीपाड्याकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यालगत वनक्षेत्र जमीनीवरील शेतात मानवी मेंदूवर विपरीत परिणाम घडवून आणणारे गांजा सदृश्य अंमली पदार्थाच्या वनस्पतीची बेकायदेशीरपणे लागवड करून ते अवैध विक्रीसाठी वाढवत असल्याची गोपनीय माहिती पोलाद निरीक्षक रविंद्र देशमुख यांना मिळली होती.
मिळालेल्या माहितीवरून पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या नेतृत्वात पीएसआय किरण बा-हे,संदीप मुरकुटे,पोहेकॉ ललित पाटील,पोना टी एम गवळी,पोना पंकज पाटील,भरत चव्हाण,पोकॉ गोविंद कोळी, विनोद आखडमल, मुकेश पावरा,भटू सांळूखे,आकाश सांळूखे अमित रनमळे नितीन वाघ यांच्या पथकाने छापा टाकला असता शेतात 2 ते 5 फुटापर्यंत वाढलेले गांजाची झाडे आढळून आली ती उपटून जप्त कण्यात आली.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक प्रवीणकुमार पाटील,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव,उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस पथकाने केली आहे याप्रसंगी घटनास्थळीनायब तहसीलदार चौरे यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला.पंच म्हणून शिरपूर बस स्थानक आगाराचे वाहक व चालक उपस्थित होते.पुढील कारवाई शहर पोलिसांकडून उशिरापर्यंत सुरू आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी विद्युत तारांच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली आल्यामुळे गांधीनगर टॉवर गल्ली येथे एका तरुणाचा मृत...
-
माधव खाबिया नाशिक - आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे 'लेडी सुपरकॉप' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांची र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा