Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री नामदार.मा.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे बैठक
महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री नामदार.मा.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे बैठक
साक्री प्रतिनिधी :दि २२/९/२०२१रोजी साक्री विधानसभा मतदारसंघातील पिंपळनेर - ताहराबाद - सटाणा व कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सातारा - पंढरपूर महामार्ग तसेच या एमएसआरडीसी च्या अखत्यारीतील रस्त्यांच्या कामांचा आढावा घेण्याकरिता आज विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले.
यावेळी साक्री तालुका विधानसभा क्षेत्राच्या
आमदार मा.सौ.मंजुळाताई तुळशीराम गावित ,सातारा विधानसभेचे आमदार मा.महेशजी शिंदे,महाराष्ट्र शासन आदिवासी सेवा पुरस्कार पुरस्कृत व माजी धुळे जि.प.सदस्य तथा शिवसेना धुळे जिल्हा प्रमुख मा.श्री.डाॅ.तुळशीरामजी गावीत साहेब,मा.अनिलकुमार गायकवाड(उप-व्यवस्थापकीय संचालक एमएसआरडीसी ) तसेच विविध वरिष्ठ अधिकारी आदि उपस्थित होते.
या बैठकीत साक्री तालुका विधानसभा क्षेत्राच्या आमदार मा.सौ.मंजुळाताई तुळशीराम गावित यांनी साक्री विधानसभा मतदारसंघातील पिंपळनेर - ताहराबाद - सटाणा तसेच साक्री तालुक्यातील विविध रस्त्यांच्या कामांच्या बाबतीत उपस्थित विविध अडचणी,मंजुरी,पुर्तता अशा विविध केलेल्या सुचनांच्या अनुषंगाने कामांचा चर्चा पाठपुरावा केला.त्यावर महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री नामदार.मा.एकनाथजी शिंदे साहेब यांनी या रस्त्यांचे काम नियोजित वेळापत्रकानुसार पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी विद्युत तारांच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली आल्यामुळे गांधीनगर टॉवर गल्ली येथे एका तरुणाचा मृत...
-
माधव खाबिया नाशिक - आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे 'लेडी सुपरकॉप' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांची र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा