Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१

लाचखोर लिपीक एसीबीच्या जाळ्यात लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ



नाशिक : १० हजारांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागातील दोघा लिपिकांना एसीबीच्या पथकाने गजाआड केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. आपल्याच कार्यालयातील निवृत्त सहकाऱ्याकडून लाचेची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उत्तर विभाग कार्यकारी अभियंता कार्यालयातील मुख्य व वरिष्ठ लिपिक यांच्या अंगलट आली आहे.

मुख्य लिपिक प्रवीण नामदेव पिंगळे व वरीष्ठ लिपिक लता शांताराम लहाने (बोडके) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.आपल्याच विभागाच्या कर्मचाऱ्याकडे मागितली लाच निवृत्त कर्मचाऱ्याकडून सेवापुस्तक पडताळणी व रजेच्या फरकाच्या बिलासह अन्य बिलांचे काम करून देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सापळा रचून पकडले आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार बांधकाम विभागातून ३० जुलै २०२१ रोजी सेवानिवृत्त झाल्या आहे. त्यांचे सेवापुस्तक पडताळणी व रजेच्या फरकाचे बील यासह इतर बिलांचे काम करून देण्यासाठी मुख्य लिपीक प्रविण नामदेव पिंगळे व वरिष्ठ लिपिक लता शांताराम लहाने (बोडके) यांनी त्यांच्याकडून १० हजार रुपयांची मागणी केली होती.

त्यामुळे तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक निभागाच्या नाशिक कार्यालयात तक्रार दिली होती. त्यानुसार एसीबीने चौकशी करून सापळा रचून मुख्य लिपीक प्रवीण नामदेव पिंगळे व वरीष्ठ लिपिक लता शांताराम लहाने (बोडके) यांना गुरुवारी लाचेची रक्कम स्विकारताना पकडल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक सतीश भामरे यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध