Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १९ सप्टेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
साक्री मध्ये भर वस्तीत विद्या नगर परिसरात बियर बार चालू होऊ नये यासाठी परीसरातील लोकांनी अनेक प्रयत्न करूनही मुजोर बियर बार चालक करतो आहे मनमानी
साक्री मध्ये भर वस्तीत विद्या नगर परिसरात बियर बार चालू होऊ नये यासाठी परीसरातील लोकांनी अनेक प्रयत्न करूनही मुजोर बियर बार चालक करतो आहे मनमानी
धुळे प्रतिनिधी:साक्री मधील विद्या नगरच्या प्रवेशद्वारावर खंडेराव कॉम्प्लेक्समध्ये येऊ घातलेल्या परमिटरूम बियर बार च्या विरोधात वेळोवेळी सर्व 10/15 कॉलनी वासियांनी विरोध दर्शविलेला असतानाही आज दिनांक 18 सप्टेंबर 2021 रोजी संबंधित बिअर बार परमिट रूम च्या मालकाने काम सुरू करण्याचा प्रयत्न केला ही बाब लक्षात आल्यानंतर लगेच सदरचे काम बंद करण्यासाठी कॉलनी परिसरातील ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब श्री.बी.एम.भामरे सर,पत्रकार श्री.पी.झेड.कुवर सर,पत्रकार धनंजय सोनवणे तसेच साक्रीचे माजी नगरसेवक सुमित नागरे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष जितेंद्र मराठे,शिवसेनेचे तालुकाप्रमुख पंकज मराठे,,माजी तालुका प्रमुख किशोर आप्पा वाघ,कॉलनी परिसरातील अनेक जण उपस्थित होते.
यावेळी संबंधित बीअर बार मालक यांना सर्वांनी विरोध दर्शवत आम्ही कायदेशीर दृष्ट्या तालुक्याच्या आमदार श्रीमती मंजुळाताई गावित सो., जिल्हाधिकारी सो.,तहसीलदार सो.यांना निवेदने दिली आहेत, त्यासंदर्भात जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत काम बंद ठेवावे असे स्पष्ट सांगण्यात आले.
परिसरातील दहा ते पंधरा कॉलनी मध्ये राहणाऱ्या नागरिकांचा,माता भगिनींचा,विध्यार्थ्यांचा या बियर बार ला स्पष्ट विरोध असताना आपण या बियर बार चे काम का सुरू ठेवीत आहेत असा जाब विचारला तसेच परमिट रूम बियर बार मालक यांना काम बंद ठेवण्यास सांगितले ,
जनभावनेचा आदर न केल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला व त्याची सर्व जबाबदारी संबंधितांची राहील असे मत सर्वांनी व्यक्त केले.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव साक्री
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
▶ वणी प्रतिनिधी : राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.१) मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुव्दाराचे समोर मंगरुळ फाटा मंगरुळ (ता...
-
अमळनेर | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार अमळनेर शहरात गुरुवारी पहाटे राबविण्यात आलेल्या विशेष कोम...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा