Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १९ सप्टेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
शिरपूर एज्युकेशन सोसायटीच्या आर.सी. पटेल अनुदानित आदिवासी आश्रमशाळेचे असली,ता.शिरपूर येथे उदघाटन केले
शिरपूर एज्युकेशन सोसायटीच्या आर.सी. पटेल अनुदानित आदिवासी आश्रमशाळेचे असली,ता.शिरपूर येथे उदघाटन केले
शिरपूर प्रतिनिधी:आदिवासी मुलांना चांगल्या शिक्षणासाठी अनेक योजना आमच्या काळात राबविण्यात आल्या.आता अशा आश्रमशाळा सुद्धा शासनामार्फत उभारण्याची नितांत गरज आहे!
श्री विलेपार्ले केळवाणी मंडळ, मुंबईच्या मुकेशभाई आर.पटेल सैनिकी शाळा, निवासी शाळा तसेच इनडोअर स्टेडियमचे तांडा, ता. शिरपूर येथे आज उदघाटन केले. अंबरिभाई पटेल,गिरीश महाजन,जयकुमार रावल आदी उपस्थित होते.
अंबरिशभाई पटेल यांनी शिरपूरला उद्योगनगरी आणि विद्यानगरीत परावर्तित केले.नेत्याला दृष्टी असावी लागते, तरच तो विकासात भरीव योगदान देऊ शकतो. राजकारणात काम करतानाही विविध संस्थांचा दर्जा राखता येणे, हे अनोखे कौशल्य आहे आणि ते अंबरिशभाईंनी साधले आहे.
शिरपूर-60 हा सैनिकी शाळेतील अतिशय स्तुत्य आणि पथदर्शी उपक्रम आहे. शिक्षणातून स्वाभिमान आणि आत्मविश्वास मिळतो, तो मला या विद्यार्थ्यांमध्ये पाहता आला. प्रत्येक गोष्टीत नियोजन आणि त्यामागे ठोस संकल्पना या प्रत्येक संस्थांमध्ये दिसून येतो. म्हणूनच हे उपक्रम वेगळे आहेत.केवळ शिक्षण नाही तर उत्तम खेळाडू निर्माण करण्याचे कामही येथे साधले जाते आहे.अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये आहेत.एकूणच सर्वांगिण विकासावर भर दिला जात आहे. येणार्या काळात काही चांगले ऑलिम्पिकपटू सुद्धा येथून घडतील. या सर्व उपक्रमांना मी अनेकानेक शुभेच्छा देतो.
- देवेंद्र फडणवीस
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

उत्कृष्ठ थोडक्यात बातमी जनतेला आपल्या बातमी मार्फत कमीत कमी कुठला कार्यक्रम होता ते झटपट कळते
उत्तर द्याहटवा