Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १८ सप्टेंबर, २०२१
"सत्रासेन येथील नागरिकांनी केले श्रमदान"
सत्रासेन प्रतिनिधी: ता. चोपडा; नादुरुस्त रस्ते आणि अपघात नेहमीचंच समीकरण आहे.उखडलेल्या रस्त्यांमुळे अपघात होतो.नागरिकांचा नाहक बळी जातो.तरीही प्रशासक ढिम्म असतं आता तर पावसाळा संपायला आला आहे.
रस्त्यात अनेक ठिकाणी खड्डे आहेत.
पावसाचं पाणी खड्ड्यात साचून दिवसेंदिवस अपघातांमध्ये वाढ होणार आहे.त्यामुळे रस्त्यांची डागबुजी करून खड्डे बुजवून रस्त्याचं नूतनीकरण करुण करावं, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.मात्र सत्रासेन येथे एक वेगळंच चित्र पाहायला मिळालंय.
(सत्रासेन नागरिकांकडून श्रमदान)
सत्रासेन येथील नागरिक गावातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यास सरसावले.पावसात रस्त्यावर खड्डे पडल्याने अपघाताच्या घटना घडतात.शिवाय पदाचाऱ्यांनाही याचा त्रास होतो.त्यामुळे केवळ प्रशासनाची वाट न पाहता,काही नागरिक स्वतः हातात कुदळ, फावडे घेत गावाबाहेरील खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा